युवा भीम सेना अराजकीयपणे सामाजिक कार्यात अग्रेसर : महेश डोलारे

  मोहोळ : महाराष्ट्र राज्यामध्ये युवा भीम सेना ही अराजकीयपणे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. कोणत्याही समाजबांधवावर अन्याय झाला तर ही संघटना स्वस्थ बसणार नसून अन्यायाविरुद्ध आमचे पदाधिकारी व कार्यकर्ते पेटून उठतील, असे युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी सांगितले.

  मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहामध्ये युवा भीम सेना महाराष्ट्र राज्याच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आंबिका देढे, ज्ञानेश्वरी सकट यांची प्रमुख उपस्थिती होती.

  यावेळी राज्य उपाध्यक्ष खंडू बनसोडे, शांतीकुमार अष्टुळ बबलू डोलारे, संजय आठवले यांनी मार्गदर्शन केले. युवा भीम सेनेचा नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

  यावेळी दीपक भालेराव, राजन घाडगे, आनंद मोरे, भैय्या कांबळे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा साबळे यांनी केले.

  युवा भीम सेना मोहोळ शहर कार्यकारिणी खालीलप्रमाणे – 

  मोहोळ तालुकाध्यक्षपदी राम कांबळे तर मोहोळ शहराध्यक्ष राजू अष्टुळ, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात साबळे व नवनाथ कसबे, उपाध्यक्ष विजय बनसोडे, उपाध्यक्ष अजय पवार, कार्याध्यक्ष सुरेंद्र काळे, सचिव आनंद जाधव, उपाध्यक्ष किरण भालेराव, उपाध्यक्ष दादा भिसे, उपाध्यक्ष सचिन रणदिवे, उपाध्यक्ष चेतन सकट, कार्याध्यक्ष राम रणदिवे, संघटक किसन जाधव, सचिव अविनाश काळे, शहर महिला अध्यक्ष रेखा मोरे आदि पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.