जिल्हा परिषदेचा ७१ कोटींचा निधी शिल्लक ; निधी खर्ची करण्याची विभागप्रमुखांची धडपड

-अर्थसंकल्प सभेची तयारीला सुरुवात

  सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचा विविध विकास कामांसाठी देण्यात आलेला ७१ कोटींचा निधी शिल्लक राहीला आहे. जिल्हा नियोजन मंडळ आणि जि.प.सेसफंडाचा यात समावेश आहे. मार्च अखेर असल्याने निधी खर्ची करण्यासाठी विभागप्रमूखांची धडपड दिसून येत आहे. २५ मार्च रोजी अर्थसंकल्प सभा असल्याने बजेटची जोरदार तयारी करण्यात येत आहे.

  अर्थ विभागाने दिलेल्या माहीती नुसार सन २०१९ – २० सालातील परवानगी प्राप्त स्कमेतून फेब्रुवारी २०२१ अखेर पर्यंत १२२कोटी ६७ लाख ९३ हजार पैकी ५६ कोटी ७५ लाख इतका निधी शिल्लक राहीला आहे.५३.७४% निधी खर्च करण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्हा परिषदेच्या स्वउत्पनातील २१कोटी १४ लाख ९ हजार प्राप्त निधी पैकी १४ कोटी ९६ लाख इतका निधी शिल्लक राहीला आहे. २९.२३% आत्ता पर्यंत निधी खर्च करण्यात आला आहे.

  जिल्हा वार्षिक योजनेतील ग्रामपंचायत ३कोटी ३४ लाख ३३ हजार ,बांधकाम विभाग २ ,१कोटी ४८लाख ,६९ हजार ,बांधकाम विभाग १ ,१ कोटी २२ लाख ,४० हजार ,ग्रामीण पाणी पूरवठा १कोटी २० लाख ८८ हजार,लघू पाटबंधारे ३कोटी २०लाख ८१ हजार ,कृषी २कोटी ९६ लाख ,७६ हजार, शिक्षण ८ कोटी ७५ लाख ९३ हजार ,आरोग्य १४ कोटी,२९ लाख ३हजार,समाजकल्याण १८कोटी ७८ लाख २८ हजार ,महीलाबाल कल्याण ६१ लाख ९७ हजार,पशूसंवर्धन ८५ लाख ९३ हजार , आशी विभागांची प्राप्त रक्मेतून शिल्लक राहीलेली निधींची आकडेवारी आहे.तर २०२०-२१ सालातील सेसफंडाच्या प्राप्त निधी पैकी ग्रामपंचायत २५ लाख,बांधकाम विभाग २,४४लाख २९हजार ,बांधकाम विभाग १,२कोटी ८७ लाख ९१ हजार,ग्रामीण पाणीपूरवठा ३३लाख २८ हजार ,लघू पाटबंधारे ५०लाख ४६ हजार,कृषी १कोटी ७५ लाख शिक्षण ३कोटी ४१ लाख,२६ हजार ,आरोग्य १कोटी ४७ लाख ,५२ हजार,समाजकल्याण २कोटी २८ लाख, महीलाबाल कल्याण १ कोटी २६ लाख ८ हजार,पशुसंवर्धन ३७ कोटी ३९ हजार , इतका निधी सेसफंडातील शिल्लक राहीला आहे.

  जि.प.च्या सर्व विभाग प्रमूखांना मार्च अखेर पर्यंत निधी खर्च करण्याची सुचना सीईओ यांनी दिले आहेत. निधी खर्ची पाडण्यासाठी विभाग प्रमूखांची लगबग दिसून येत आहे.

  अजयसिंह पवार, मुख्य वित्त व लेखाधिकारी जि.प.

  ४ कोटी शासन जमा होण्याच्या मार्गावर

  आरोग्य विभागातील ४ कोटी शासन जमा होण्याच्या मार्गावर आहे. एप्रिल अखेर पर्यंत निधी खर्च करण्याची डेडलाईन आहे.