जि. प. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून गुरूंचा सत्कार

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : गुरुविना जीवन व्यर्थ आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात असून गुरुवंदना शिक्षक दिनाचे औचित्य साधून कामती बु. ता. मोहोळ येथील जि. प. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी गुरूंचा यथोचित सत्कार करून शिक्षक दिन साजरा केला.

    यावेळी श्री स्वामी समर्थ वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम गायकवाड गुरुजी यांचा सत्कार कामतीचे युवा नेते प्रवीण भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. रमेश भोसले गुरुजींचा सत्कार माजी सैनिक विलास भोसले यांच्या हस्ते तर ज्ञानदेव भोसले गुरुजींचा सत्कार पापा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

    यावेळी सत्काराला उत्तर देताना सर्वच गुरुजींनी विद्यार्थ्यांचे आभार मानत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    यावेळी माजी विद्यार्थी मारुती खराडे, भैरवनाथ पाटील, गणेश भोसले, हरी भोसले, इस्माईल मुजावर, श्रीनिवास भोसले, प्रवीण भोसले, पापा पवार आदी उपस्थित होते.