sharad pawar

यशवंतराव चव्हाण यांचे शिष्ट आणि महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणातील महान नेते शरद पवार हे इ.स. २००४ पासून देशाच्या पंतप्रधानपदासाठी उत्सुक आहेत, परंतु त्यांना मात्र पंतप्रधानपद हुलकावणीच देत आहेत.

भाषावाद प्रांतरचना आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनिमित्त मुंबईत इ.स. १९६० मध्ये घेण्यात आलेल्या मेळाव्यात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले होते की, यशवंतराव चव्हाण हे देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. परंतु ६० वर्षांनंतरही कोणीही मराठी मनुष्य भारताचा पंतप्रधान होऊ शकला नाही. यशवंतराव चव्हाण यांचे शिष्ट आणि महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणातील महान नेते शरद पवार (Sharad Pawar ) हे इ.स. २००४ पासून देशाच्या पंतप्रधानपदासाठी उत्सुक आहेत, परंतु त्यांना मात्र पंतप्रधानपद हुलकावणीच देत आहेत. अध्यक्षपदी शरद पवार यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली असली तरी त्यांना ओळखणाऱ्या नेत्यांना मात्र असे वाटते की, ज्यो बिडेन वयाच्या ७८ व्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्रपती होऊ शकतात तर ८३ वर्षाचे राकाँ प्रमुख भारताचे पंतप्रधान का होऊ शकणार नाही. शेतकरी आंदोलनानिमित्त राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यासाठी जेव्हा विविध विरोधी पक्षाचे नेते गेले होते, तेव्हा पुन्हा या. चर्चेला उधाण आले.

राजकीय जोडतोड करण्याची क्षमता

शरद पवार यांचा राजकीय जोडतोड करण्यात हातखंडा आहे. १९७० मध्ये जेव्हा काँग्रेसपक्ष त्यांना राज्याचे मुख्यमंत्री बनविण्यास तयार नव्हता तेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाला फोडून पुलोदची स्थापना केली व राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर जेव्हा त्यांची काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची इच्छा झाली, तेव्हा ते काँग्रेसमध्ये गेले व अनेकदा काँग्रेसमधून बाहेरही पडले. परंतु १९९८ मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशी असल्याच्या मुद्दयावरून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. तथापि १९९० मध्ये महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाले तेव्हा काँग्रेसचा सहकारी पक्ष म्हणून त्यांचा राकाँ पक्ष सत्तेत सहभागी झाला.

केंद्रातील वाजपेयी सरकारमध्येही पवार सहभागी झाले होते. केंद्रात जेव्हा पहिल्यांदा युपीएचे सरकार स्थापन झाले, तेव्हा त्यांचा राजकीय वनवास संपला. एक वेळ अशी आली होती की, सोनिया गांधी पवारांना पंतप्रधान करतील, परंतु सोनियाने प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान बनविले होते. पवारांनी डाव्या पक्षांना सोबत घेऊन विरोध करू नये म्हणून सोनियांनी पवारांकडे कृषिमंत्रिपद सोपविले होते. पवारांची राजकीय शक्‍ती वाढली असली तरी त्यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले. त्यानंतर इ. स. २००९ मध्ये काँग्रेस केंद्रात मजबूत होती. डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे दुसऱ्यांदा पंतप्रधानपद आले, तेव्हासुद्धा पवार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले होते, परंतु युपीएने त्यांच्या नावाला फारशे महत्त्व दिले नाही.

सोनिया गांधी राजकीयदृष्टय़ा मजबूत होत गेल्या आणि पवार कमजोर झाले. इ.स. २०१४ मध्ये जेव्हा काँग्रेसचे पतन सुरू झाले तेव्हा पवार यांनी पुन्हा आपला पवित्रा बदलला. त्यांनी भाजपासोबत जवळीक वाढविली. महाराष्ट्रात भाजपाच्या देवेंद्र फडणवीस व देशात नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे पवारांनी समर्थन केले. मोदी यांनी पवारांच्या निमंत्रणावरून पवारांच्या बारामतीलाही भेट दिली. त्यावेळी मोदी म्हणाले होते की, जेव्हा आपण पवारांसोबत दोन-तीन वेळा चर्चा करीत नाही, तोपर्यंत कोणत्याही निर्णयापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पवारांवर मात करून शिवसेनेला जवळ केले होते.

काँग्रेसच्या भूमिकेमुळे युपीए परेशान

इ.स. २०१९ मध्ये दुसर्‍यांदा मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपाची सत्ता आली, त्यावेळी मात्र युपीएची एकूणच परिस्थिती ढासळली. याचे मुख्य कारण म्हणजे सोनिया गांधी यांची एकाधिकार प्रवृती. कोणत्याही परिस्थितीमध्ये राहुल गांधींना सोनियांना राजकीयदृष्ट्या पुढे आणायचे होते. राहुलच्या नेतृत्वात मात्र मध्यप्रदेशातून काँग्रेसपद सत्तेपासून दुरावला. कर्नाटकमध्येसुद्धा गैरकाँग्रेस सरकार सत्तेवर आले. राजस्थानातही काँग्रेस अधांतरीच राहिली. युपीएच्या घटक पक्षांना राहुलच्या नेतृत्वात युपीए सुरक्षित राहू शकत नाही, असे वाटू लागले. याउलट पवारांच्या नेतृत्वक्षमतेवर बहुतांश विरोधी पक्षांचा विश्‍वास आहे. डीएमके असो किंवा केसीआर, ममता, मुलायमसिंग, येच्युरी, चंद्राबाबू आणि मायावती या नेत्यांसोबतही पवारांचे संबंध आहेत. क्रिकेट आणि राजकारणाच्या धावपट्टीवर पवार नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत.

सरकार पाडणे आणि बनविण्यात हातखंडा

देशाच्या राजकारणात पवारांनी जेवढे प्रयोग केले असेल तेवढे देशातील कोणत्याही नेत्याने केले नसेल. इ.स. २०१४ नंतर देशाच्या राजकारणात मोदी-शाह पॅटर्न आले, हीसुद्धा पवारांचीच देण आहे. भाजपाचे सरकार बनविण्यासाठी ज्याप्रमाणे मोदी आणि शाह कोणतेही पथ्य पाळत नाही, अगदी त्याचप्रमाणे पवारही करतात. पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून आपल्या राजकीय क्षमतेची चुणूक दाखवून दिली. शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस सरकार बनवू शकते, असा विचार कोणीही केला नसेल, परंतु पवारांनी काँग्रेस सरकार बनवू शकते, असा विचार कोणीही केला नसेल, परंतु पवारांनी काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी करून हा भ्रम दूर केला. राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न आता पवार राष्ट्रीय पातळीवरही नेऊ शकतात. पवारांनी युपीएचे नेतृत्व केले तर मोदी-शाह यांच्या जोडीला ते राष्ट्रीयस्तरावर नक्कीच पर्याय उभा करू शकेल.