Amazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार

Amazon.in हिंदी भाषेत व्हॉइस शॉपिंग सुरू करून प्रादेशिक भाषांतील ऑफरिंग अधिक विस्तारणार आहे. या नवीन उपक्रमांमुळे भाषेचा अडथळा दूर होत आहे आणि ईकॉमर्स (E Commerce) भारतभरातील लक्षावधी ग्राहकांसाठी अधिक उपलब्ध होण्याजोगे तसेच सोयीस्कर होत आहे.

  • २०२१ मध्ये ५ दशलक्षांहून अधिक लोकांनी Amazon.in वरून भारतीय भाषा वापरत खरेदी केली
  • ग्राहक आता Amazon.in वर ८ भाषांचा वापर करून खरेदी करू शकतात
  • यांमध्ये हिंदी, इंग्रजी, कन्नड, मल्याळम, तमीळ, तेलुगू आणि नव्याने समाविष्ट झालेल्या मराठी व बंगाली या भाषांचा समावेश
  • इंग्रजीमध्ये व्हॉइस शॉपिंगचा वापर करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत २ पट वाढ झाली आहे

बेंगळुरू : सणासुदीचा काळ जवळ आलेला असतानाच, Amazon.in वरून ग्राहक मराठी व बंगाली भाषांचाही वापर करून खरेदी करू शकतात अशी घोषणा अमेझॉन इंडियाने आज केली. हिंदी, इंग्रजी, कन्नडा, मल्याळम, तमिळ व तेलुगू या पाच भाषा वापरून खरेदी करण्याची सुविधा आधीपासूनच आहे.

Amazon.in हिंदी भाषेत व्हॉइस शॉपिंग सुरू करून प्रादेशिक भाषांतील ऑफरिंग अधिक विस्तारणार आहे. या नवीन उपक्रमांमुळे भाषेचा अडथळा दूर होत आहे आणि ईकॉमर्स (E Commerce) भारतभरातील लक्षावधी ग्राहकांसाठी अधिक उपलब्ध होण्याजोगे तसेच सोयीस्कर होत आहे.

Amazon.in मराठी व बंगाली भाषेत सुरू करण्याच्या प्रक्रियेदरम्यान, अ‍मेझॉनने प्रत्येक भाषेमध्ये अचूक व समजण्याजोगा यूजर अनुभव विकसित करण्यासाठी कुशल भाषातज्ज्ञांसोबत काम केले आहे. अचूक भाषांतर करण्याऐवजी टीमने अधिक वापरात असलेल्या संज्ञांचा वापर केला आहे, जेणेकरून खरेदीचा अनुभव अस्सल, समजण्यास सोपा आणि ग्राहकांसाठी सुखद व्हावा. अमेझॉन ग्राहक अँड्रॉइड किंवा आयओएस ॲप्स, मोबाइल तसेच डेस्कटॉप साइट्सवरून काही सुलभ पायऱ्यांद्वारे त्यांच्या पसंतीची भाषा निवडू शकतात.

ग्राहकाने एकदा भाषा निवडली की, भाषा प्राधान्याची (लँग्वेज प्रेफरन्स) नोंद केली जाते आणि ग्राहकाच्या पुढील भेटींच्या वेळी हे स्मरणात ठेवले जाते. ग्राहक आता सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा खरेदी अनुभव त्यांनी निवडलेल्या भाषांमध्ये घेऊ शकतील, सणासुदीचा काळ जवळ आलेला असल्याने त्यांना उत्तम डील्स व सवलतींची माहिती दिली जाईल, ते ऑर्डर्स प्लेस करून पैसे चुकते करू शकतील, उत्पादनाबद्दलती तपशीलवार माहिती वाचू शकतील, त्यांच्या खात्याची माहिती व्यवस्थापित करू शकतील, ऑर्डर ट्रॅक करू शकतील आणि ऑर्डर हिस्टरीही बघू शकतील.

२०२० वर्षात इंग्रजीमध्ये व्हॉइस शॉपिंग सुरू केल्यानंतर आता लवकरच हा अनुभव हिंदी भाषेतही आणला जाणार आहे. हिंदी भाषेत व्हॉइस शॉपिंग सुरू झाल्यानंतर ग्राहक आपल्या आवाजाचा वापर करून उत्पादनांचा शोध घेऊ शकतील किंवा ऑर्डरच्या स्टेटसबद्दल जाणून घेऊ शकतील. उदाहरणार्थ, ग्राहक माइक आयकॉनवर टॅप करतील आणि पादत्राणांचा शोध घेण्यासाठी म्हणतील “जुते दिखाओ” किंवा ऑर्डर ट्रॅक करण्यासाठी ते “मेरा सामान कहाँ है” असे विचारू शकतील. हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग अनुभव उपलब्ध करून घेण्यासाठी ग्राहकांना त्यांचे अमेझॉन ॲप प्ले स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करून घेणे आवश्यक ठरेल. ॲप अपडेट करून घेतल्यानंतर ग्राहक ते ॲप उघडून त्यांच्या पसंतीची ॲप भाषा म्हणून हिंदी निवडू शकतात आणि सर्च बारच्या बाजूला दाखवलेल्या मिक आयकॉनवर क्लिक करू शकतात. व्हॉइस ऑफरिंग केवळ अँड्रॉइड उपकरणांसाठीच उपलब्ध आहे. या लाँचमुळे ग्राहक हिंदी किंवा इंग्रजी भाषेत आपल्या आवाजाचा वापर करून अँड्रॉइड ॲपवरील Amazon.inच्या अनेकविध टचपॉइंट्सवर जाऊ शकतात, उत्पादने शोधू शकतात व अन्य अनेक सुविधांसह वस्तू कार्टमध्ये टाकू शकतात.

“प्रादेशिक भाषेत खरेदीचा अनुभव देण्यामागील आमचे उद्दिष्ट, ईकॉमर्स सर्वांना उपलब्ध करणे तसेच ग्राहकांसाठी ते अधिक सुसंबद्ध व सोयीस्कर करणे, हे आहे. दर महिन्याला लक्षावधी ग्राहक प्रादेशिक भाषेचा वापर करून Amazon.in ला भेट देत आहेत आणि आमचे ९० टक्के ग्राहक हे श्रेणी २ किंवा त्याहून लहान शहरांमधील आहेत. या सणासुदीच्या काळात Amazon.inचा अनुभव आमच्या मराठी व बंगाली ग्राहकांपर्यंत नेताना आम्हाला आनंद होत आहे,” असे अमेझॉन इंडियाच्या कस्टमर एक्स्पिरिअन्स व मार्केटिंग विभागाचे संचालक किशोर थोटा म्हणाले.  “२०२० मध्ये व्हॉइस शॉपिंग सुरू झाल्यानंतर आम्हाला असे दिसले की, आवाजाचा वापर करण्याची सुविधा झाल्यामुळे Amazon.in मार्फत खरेदीची गरज पूर्ण करणाऱ्या ग्राहकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. ही वाढ भारावून टाकणारी होती. आम्ही आमच्या ग्राहकांचा खरेदी अनुभव अधिक रोमांचक व समाधान देणारा करण्याच्या दृष्टीने नवनवीन फीचर्स आणणे सुरूच ठेवणार आहोत,” असे किशोर थोटा पुढे म्हणाले.

प्रादेशिक भाषा तसेच व्हॉइस आणि व्हिडिओजच्या माध्यमातून अनेकविध ऑफरिंग्ज स्थानिक स्तरावर आणून अमेझॉन इंडिया ग्राहक व व्यवयास दोहोंच्या डिजिटल संधी वाढवण्यासाठी नवोन्मेषकारी काम करत आहे. जून २०२०पासून Amazon.in ने विक्रेता नोंदणी व अकाउंट व्यवस्थापन सेवा हिंदी, तमिळ, कन्नड, मराठी, तेलुगू, मल्याळम व बंगाली भाषांमध्ये सुरू केल्या आहेत. व्हॉइसमध्ये स्मार्ट स्पीकरच्या एको रेंजला शक्ती देणारी अमेझॉन अलेक्सा ही क्लाउडवर आधारित व्हॉइस सेवा इंग्रजी व हिंदी भाषेत उपलब्ध आहे आणि या सेवेला हिंदी, मराठी, गुजराती, कन्नडा, बंगाली, तमिळ, तेलुगू आदी भाषांतील विशेषनामेही समजू लागली आहेत.

व्हिडिओमध्ये अमेझॉन प्राइम व्हिडिओ हिंदी, इंग्रजी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नडा, मराठी, गुजराती, पंजाबी व बंगाली भाषेत शीर्षके देते. वापरकर्ते इंग्रजीसोबतच हिंदी, तमिळ व तेलुगू भाषांमधून प्राइम व्हिडिओ ब्राउज करू शकतात. याशिवाय Amazon.in शॉपिंग ॲपमध्ये प्रोडक्ट पेजेसवर उत्पादनांचा व्हिडिओ स्वरूपातील सारांश इंग्रजी भाषेत दिलेला आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदीचे निर्णय अधिक सुलभतेने करता येतील. किंडल डायरेक्ट पब्लिशिंगच्या माध्यमातून लेखक आपले काम स्वत:च प्रकाशित करू शकतात. ही सुविधा इंग्रजीसह हिंदी, तमिळ, मल्याळम, मराठी व गुजराती या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

अमेझॉन प्रादेशिक भाषांतून खरेदीचा अनुभव अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने उत्क्रांतीची प्रक्रिया सुरूच ठेवणार आहे, येत्या सणासुदीच्या काळात लक्षावधी ग्राहकांना ऑनलाइन खरेदीचे फायदे अनुभवण्यासाठी या फीचर्सचा उपयोग होणार आहे.