विजय रणस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त वाहतुकीत बदल

कोरेगाव भीमा - पेरणे (ता . हवेली ) येथील विजयस्तंभ हा भिमा नदीचे तिराजवळ पुणे अहमदनगर महामार्गावर आहे. या ठिकाणी येण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे दि . १ जानेवारीला जिल्हाधिकरी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशाने दि. ३१ डिसेंबरला सायंकाळी पाच पासून दि. १ जानेवारी रोजी रात्रौ बारा वाजेपर्यंत पुणे -नगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

    कोरेगाव भीमा : १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी देश आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता पेरणे (ता . हवेली ) येथे येत असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता विचारत घेऊन शनिवारी ( दि. १ ) पुणे -नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

    कोरेगाव भीमा – पेरणे (ता . हवेली ) येथील विजयस्तंभ हा भिमा नदीचे तिराजवळ पुणे अहमदनगर महामार्गावर आहे. या ठिकाणी येण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे दि . १ जानेवारीला जिल्हाधिकरी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशाने दि. ३१ डिसेंबरला सायंकाळी पाच पासून दि. १ जानेवारी रोजी रात्रौ बारा वाजेपर्यंत पुणे -नगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
    वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग शिक्रापूर ते चाकण मार्गावर सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. अहमदनगर बाजूकडून पुणे, मुंबईकडे येणारी जड वाहने शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगांव, चौफुला, यवत, सोलापूर रोड मार्गे पुण्याकडे जातील. पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहने पुणे- सोलापूर रोडने चौफुला, केडगांव मार्गे न्हावरा, शिरुर , अहमदनगर रोड अशी जातील.