Kirit Somayya

सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करोना काळात काम नव्हे तर खाली मान घालून पैसे मोजत होते. स्वतःच्या बायकोचे 19 बेकायदेशीर बंगले मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगले बांधले होते, ते वाचवण्यासाठी व्यस्त होते. अनिल परब यांनी कोरोनाच्या काळात दापोलीमध्ये रिसॉर्ट बांधला मार्च 2020 मध्ये वीजेचं कनेक्शन घेतलं आणि आता मार्च 2021 उद्घाटन केलं, त्यांना वाचवण्यासाठी ते व्यस्त होते. त्यामुळे त्यांना मानवर करण्यासाठी वेळ मिळाला नाही. असं म्हणत सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

    राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचा त्रास झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांच्या प्रकृतीवरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी टीका करण्याची संधी सोडली नाही. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजत होते आणि स्वकीयांना वाचवण्यात व्यस्त असल्यानेच त्यांना मानेचा त्रास झाला’, असं वादग्रस्त वक्तव्य किरीट सोमय्यांनी केलं आहे.

    सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करोना काळात काम नव्हे तर खाली मान घालून पैसे मोजत होते. स्वतःच्या बायकोचे 19 बेकायदेशीर बंगले मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगले बांधले होते, ते वाचवण्यासाठी व्यस्त होते. अनिल परब यांनी कोरोनाच्या काळात दापोलीमध्ये रिसॉर्ट बांधला मार्च 2020 मध्ये वीजेचं कनेक्शन घेतलं आणि आता मार्च 2021 उद्घाटन केलं, त्यांना वाचवण्यासाठी ते व्यस्त होते. त्यामुळे त्यांना मानवर करण्यासाठी वेळ मिळाला नाही. असं म्हणत सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

    ‘बुलडाणा अर्बन’ने दिलेल्या कर्जासंबंधी माहिती घेण्यासाठी शुक्रवारी किरीट सोमय्या हे बुलडाण्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.

    मागील काही दिवसापूर्वी बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्थेत आयकर विभागाच्या चाचपणी केली होती. तर काही खात्यांबाबत कागदपत्रे पूर्ण करून घेण्याच्या सूचना संस्थेला दिल्या होत्या. दुसरीकडे भाजपा नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शाखेत मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झाले आहे, असा दावाही सोमय्यांनी केला होता. याच संदर्भात सोमय्या आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.