narak chaturdashi

दिवाळीमध्ये(Diwali 2021) येणाऱ्या नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने भौमासुराचा(नरकासूर) वध केला, ती आश्विन महिन्यातील चतुर्दशी(Narak Chaturdashi 2021) होती, म्हणून तिला नरक चतुर्दशी असेही म्हणतात.

    दिवाळी(Diwali 2021) हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो.दिवाळीच्या वेळी लोक एकत्र येऊन दिवे लावतात आणि गोड पदार्थ खातात आणि देवाची प्रार्थना करतात. असे म्हटले जाते की, उत्तरेकडे भगवान राम आणि देवी सीता अयोध्येत परत आल्याचा उत्सव साजरा केला जातो. दिवाळीमध्ये येणाऱ्या नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने भौमासुराचा(नरकासूर) वध केला, ती आश्विन महिन्यातील चतुर्दशी(Narak Chaturdashi 2021) होती, म्हणून तिला नरक चतुर्दशी असेही म्हणतात. नरकासुराचा वध करून सुमारे १६ हजार स्त्रियांना कृष्णाने बंदिवासातून मुक्त केले. या आनंदापोटी दीपप्रज्वलन(Diwali Celebration) करून सण साजरा केला जातो.

    यावर्षी नरक चतुर्दशी ३ नोव्हेंबरला आली आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी राक्षसी प्रवृतीचे प्रतिक म्हणून कारींट नावाच्या फळाला पायाने ठेचतात. ज्याप्रमाणे भगवंताने नरकासुराचा वध केला, त्याप्रमाणे आपणही आपल्यातल्या वाईट प्रवृत्तींना दूर करावे, अशी या मागची संकल्पना आहे. या दिवशी अंगणात सूर्योदयापूर्वीच सडा रांगोळी करतात. पहाटे उठून शरीराला तेल लावतात, सुवासिक उटण्याने स्नान करतात. याला अभ्यंग स्नान असे ही म्हणतात.

    या दिवशी यमाची पूजा केल्यास अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते. त्यामुळे या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला धान्याचा ढीग ठेवावा. त्यावर मोहरीच्या तेलाचा एकमुखी दिवा लावावा, परंतु दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे वळवावी.