ड्रूमद्वारे सणासुदीनिमित्त आकर्षक ऑफर्सची घोषणा; जाणून घ्या सविस्तर

ड्रूम वापरलेल्या वाहनांवर (Used Vehicles) ५०,००० रुपयांपर्यंतच्या आकर्षक डिस्काउंटसह ६ महिन्यांसाठी खरेदीदाराची ५० लाख रुपयांपर्यंतची हमीही देत आहे. यासोबतच, ड्रूमच्या सणासुदीच्या सेलमध्ये ग्राहकांना पूर्व मालकीच्या स्कूटर्स (Scooters) अगदी १,९९९ भारतीय रुपयांपासून, पूर्व मालकीच्या बाइक्स (Bikes) २९,९९९ भारतीय रुपये, तर वापरेल्या कार किमान २,९९,९९९ रुपयांपासून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

    मुंबई : देशातील भव्य सणासुदीचा हंगाम शिगेला पोहोचला असताना एआय संचलित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म (E Commerce Platform droom) ड्रूमवर सवलतींचा वर्षाव सुरू आहे. ड्रूमने वाहनांपासून आपल्या सेवांपर्यंत, विविध वस्तूंवर आकर्षक डील्स आणि ऑफर्सची (Offers) घोषणा केली आहे. सणासुदीनिमित्त या विशेष डिस्काउंट्सचा (discounts) लाभ नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते डिसेंबरपर्यंत (December) ड्रूमची वेबसाइट आणि ॲपवरून घेता येणार आहे.

    ड्रूम वापरलेल्या वाहनांवर (Used Vehicles) ५०,००० रुपयांपर्यंतच्या आकर्षक डिस्काउंटसह ६ महिन्यांसाठी खरेदीदाराची ५० लाख रुपयांपर्यंतची हमीही देत आहे. यासोबतच, ड्रूमच्या सणासुदीच्या सेलमध्ये ग्राहकांना पूर्व मालकीच्या स्कूटर्स (Scooters) अगदी १,९९९ भारतीय रुपयांपासून, पूर्व मालकीच्या बाइक्स (Bikes) २९,९९९ भारतीय रुपये, तर वापरेल्या कार किमान २,९९,९९९ रुपयांपासून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

    ड्रूम नव्या वाहनांवर ३०,००० भारतीय रुपयांपर्यंत घसघशीत कॅशबॅकही देत आहे. इतर आकर्षक डीलर ऑफर्समध्ये रोख सवलत, एक्स्चेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट, वाहनांच्या मोफत ॲक्सेसेरीज आण इतरही गोष्टींचा समावेश आहे. शिवाय, सणासुदीच्या काळात फ्लॅट ऑफर अंतर्गत ओबीव्ही प्रीमियम रिपोर्ट अगदी २९ भारतीय रुपयांत उपलब्ध होणार आहे. ड्रूमच्या स्टिव्ह ऑफर्स अंतर्गत सेलमध्ये गो ग्लोव्हज, कार पार्किंग कार्ड‌्स, हेल्मेट्स, कार परफ्यूम्स आणि बायकर स्लीव्हज अवघ्या ९ रुपयांपासून खरेदी करता येणार आहेत.

    ड्रूमचे संस्थापक आणि सीईओ संदीप अग्रवाल म्हणाले, “सणासुदीच्या हंगामात बहुतांश ग्राहक मोठमोठी खरेदी करण्याच्या विचारात असतात. या खरेदीला त्यांच्या हृदयात नेहमीच एक वेगळे स्थान असते. वाहन खरेदीचा अनुभव अगदी संस्मरणीय व्हावा म्हणून ड्रूमने नेहमीच ग्राहकाभिमुखतेवर भर दिलेला आहे. आमचा फेस्टिव्ह सीझन सेल ग्राहकांना वाहनाचा मालक होण्याचा अनुभव देत आहे. इतकेच नव्हे तर आपल्या स्वप्नातील वाहन अतिशय अविश्वसनीय किमतीत खरेदी करण्याची संधीही मिळवून देत आहे. यासोबतच वाहनांच्या ॲक्सेसेरीज अवघ्या ९ रुपयांपासून खरेदी करता येणार आहेत.”