हाच तर आमचा धंदा आहे : पात्रांचे ट्विट दिशाभूल करणारे, टूलकिटवर भाजपची फजिती; हा तर जनतेत भ्रम पसरविण्याचा प्रयत्न

गेल्या काही दिवसापासून काँग्रेस आणि भाजपमध्ये टूलकिट प्रकरणावरून जो वाद सुरू आहे, तो आता भाजपवरच उलटला आहे. या प्रकरणी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी जे ट्विट केले होते, त्या ट्विटला ट्विटरने मॅनिष्युलेटेड मीडिया म्हणजे दिशाभूल करणारा संदेश असून या ट्विटला तथ्यात्मकदृष्ट्या योग्य नसल्याचे म्हटले आहे.

    काँग्रेस पक्षाने भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व भाजपा प्रवक्ते संबित पात्रा या नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी ट्विटरला पत्र लिहिले होते. ट्विटरच्या माध्यमातून हे नेते समाजात अशांती पसरविण्याचे काम करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. पात्रा यांनी काँग्रेस पक्ष टूलकिटच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना काळात जनतेत भ्रम पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे पात्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पात्रा यांनी या संदर्भातील काँग्रेस पक्षाच्या लेटरहेडसहित काही कागदपत्रेही शेअर केली होती. पात्राच्या ट्विटला जोडतोड करून सादर करण्यात आले होते, असेही ट्विटरने म्हटले आहे.

    या प्रकरणी ट्विटरवर सरकारने नाराजी व्यक्‍त केली आहे ट्विटरद्वारा प्रसारित करण्यात आलेल्या एखाद्या संदेशाला तथ्यहीन पूर्वग्रहदूषित आणि एकतर्फी ठरविणे चुकीचे आहे. याप्रकरणीच्या वेगळाच रंग देण्यात आला आहे. ट्विटरने आपल्या मर्यादा ओलांडून काम केल्याचेही म्हटले आहे. या प्रकरणी चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच या ट्विटला तथ्यहीन ठरवून वेगळ्या श्रेणीत टाकणे म्हणजे सोशल मीडियाच्या निःपक्षपणाला बाधा निर्माण करण्यासारखे आहे. ट्विटरनेही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये. तिकडे काँग्रेसने असा आरोप केला आहे की, टॅगिंगची पुष्टी करण्यात आली असून टूलकिटच्या तक्रारी म्हणजे भाजपाकडून करण्यात आलेली धोकेबाजी आहे.

    Characters tweets misleading BJPs contempt on toolkit This is an attempt to spread confusion among the masses