रेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई

वेळ महत्त्वाची असते. रेल्वेगाड्या नियोजित वेळेवरच सुटल्या पाहिजे. काही प्रवाशांच्या नोकरीसाठी मुलाखत असतात, तर काहींना परीक्षेसाठी जायचे असते. काही लोकांना आपल्या आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी जायचे असते. त्यामुळे रेल्वेगाड्या निर्धारित वेळेवरच पोहोचल्या पाहिजे.

    देशातील पहिली खासगी रेल्वेगाडी तेजस एक्सप्रेस नियोजित वेळी न सुटल्याबद्दल या गाडीने प्रवास करणाऱ्या २१३५ प्रवाशांना ४.५० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. याचे अनुकरण आता नेहमी उशीरा सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांनीही केले पाहिजे. जर या रेल्वेगाड्यांना नुकसान भरपाई देण्यास बाध्य करण्यात आले तर सरकारी रेल्वेगाड्या सुद्धा वेळेवर सुटतील.

    तेजस एक्सप्रेसने प्रवाशांना भरपाई देऊन आपली प्रतिमा उंचावली आहे. तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली रेल्वेगाडी आहे की, जी उशीरा सुटल्याबद्दल प्रवाशांना नुकसान भरपाई देत आहे. वेळ महत्त्वाची असते. रेल्वेगाड्या नियोजित वेळेवरच सुटल्या पाहिजे. काही प्रवाशांची नोकरीसाठी मुलाखत असतात, तर काहींना परीक्षेसाठी जायचे असते. काही लोकांना आपल्या आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी जायचे असते. त्यामुळे रेल्वेगाड्या निर्धारित वेळेवरच पोहोचल्या पाहिजे.

    प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर पोहोचविण्याची जबाबदारी रेल्वेची असते. विमानाप्रमाणे सुविधा असलेल्या खासगी क्षेत्रातील तेजस एक्सप्रेसचे संचालन करणाऱ्या आयआरसीटीसीचा दावा आहे की, ही रेल्वेगाडी ९९.९ टक्के वेळेवरच सुटत असते. आता जर गाडी उशीरा सुटली असेल तर, यासाठी तेजसला जबाबदार ठरविता येणार नाही. गेल्या शनिवारी पावसामुळे रेल्वेचे स्वयंचलित सिग्नल कुचकामी ठरले होते. त्यामुळे तेजसला एकच ठिकाणी थांबून रहावे लागले. परिणामी ही गाडी अडीच तास उशीरा पोहोचली.

    तेजसचा असा नियम आहे की, या गाडीला एक तास उशीर झाळा तर २५० रुपये प्रति प्रवासी द्यावे लागतात. यापूर्वी मागील हिवाळ्यात धुक्यामुळे ही गाडी २ तास उशीरा सुटली होती, तेव्हा तेजसला प्रवाशांना भरपाई द्यावी लागली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ७ ऑगस्टपासून ही रेल्वेगाडी पुन्हा सुरु झाली आहे. लक्झरी ट्रेनसारख्या सुविधा असलेल्या या गाडीमध्ये प्रवास करणे अत्यंत आनंददायी अनभव असतो.