सुशांत प्रकरणावरुन पवार कुटुंबीयात मतभेद

पवार यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य बनविल्याबाबत येण्याविषयी सांगितले की, अशा प्रकारचे आरोप लावण्यामागे काय हेतू आहे. हे आपल्याला कळतच नाही. भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नीलेश राणे ठाकरे कुटुंबावर सतत हल्ले करीत आहेत. एका व्यक्तीने आत्महत्या केली तर इतके वादळ का उठले?

राजकारणात असलेल्या कोणत्याही कुटुंबातील सदस्यांचे एखाद्या घटनेबाबत सारखेच विचार असले पाहिजे, अशी आवश्यकता नाही. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणी पवार कुटंबातही मतभेद असल्याचे पुढे आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी सुशांत मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मागणीचे निवेदनही सादर केले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना मात्र पार्थ पवार यांनी केलेली मागणी मुळीच आवडली नाही. शरद पवार म्हणाले की, माझ्या नातवाचे वक्तव्य मी गांभीर्याने घेत नाही. तो राजकारणात अपरिपक्व आहे. महाराष्ट्र आणि मुंबईच्या पोलीसांचे काम मी गेल्या ५० वर्षांपासून बघत आहे. सुशांत मृत्यूप्रकऱणी मुंबई पोलीसांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. या प्रकराणाची सीबीआय चौकशी करण्यास आपला विरोध नाही, परंतु मुंबई पोलीसांवर मात्र आपला पूर्ण विश्वास आहे. पवार यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य बनविल्याबाबत येण्याविषयी सांगितले  की, अशा प्रकारचे आरोप लावण्यामागे काय हेतू आहे. हे आपल्याला कळतच नाही. भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नीलेश राणे ठाकरे कुटुंबावर सतत हल्ले करीत आहेत. एका व्यक्तीने आत्महत्या केली तर इतके वादळ का उठले? साताऱ्यात एका शेतकऱ्याने म्हटले आहे की, जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परंतु त्यावर कुणी साधी चर्चाही केली नाही. राजकारणात कोणतेही वक्तव्य विचारपूर्वक केले पाहिजे. पार्थने याचाही विचार केला नसेल की, त्यांचे वडील अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक पक्ष आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यास सक्षम आहेत तर पार्थने सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणे निरर्थक आहे. याचप्रमाणे पार्थने राष्ट्रवादी काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन लक्षात न घेता अयोध्येतील राममंदिर भूमिपूजन सोहळ्याबद्दल जय श्री राम अशी घोषणा देऊन या दिवसाला ऐतिहासिक दिन म्हणून सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांन पार्थ सुशांत प्रकरणी जे वक्तव्य केलेले आहे, ते त्यांचे खासगी मत असल्याचे म्हटले आहे.