तिसऱ्या आघाडीसाठी : वेळ कधीही सारखी नसते काँग्रेसपक्ष कुठे होता आणि आता कठे आहे!

 'कधी नाव गाडीवर तर कधी गाडी नावेवर' अशी एक म्हण आहे. सध्या काँग्रेस पक्षाचीसुद्धा अशीच अवस्था आहे.

  स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे केंद्र आणि राज्यांच्या सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस पक्षासमोर देशातील इतर पक्ष कमजोर होते. काँग्रेस पक्षाने देशाला पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंगासारखे पंतप्रधान दिलेत. काँग्रेसच्या पुढाकारात देशातील अन्य पक्ष त्यांच्यासोबत येत होते. युपीएची अशाच प्रकारे स्थापना झालेली आहे.

  सोनिया गांधी युपीएच्या अध्यक्षा आहेत. चांगल्या दिवसांमध्ये सर्वच सोबत असतात, परंतु जेव्हा वाईट दिवस येतात, तेव्हा सर्वच सोडून जातात. इ.स. २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाला केंद्राची सत्ता मिळू शकली नाही. यानंतर प्रादेशिक पक्षांनीही काँग्रेससोबत फारकत घेतली. तथापि, आजही भाजपनंतर काँग्रेस पक्ष हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पक्ष आहे, परंतु गैरभाजपध्यक्ष मात्र आता काँग्रेसपासून दुरावले आहेत.

  आता लहान-लहान पक्ष आघाडी करण्यासाठी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊ इच्छितात, अशाप्रकारे काँग्रेसचे मूल्य घटू लागले. तथापि, अजूनही काँग्रेस पक्षाची पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये स्वबळावर सरकारे आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे. जेव्हा जेव्हा भाजपाचा सामना करण्यासाठी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा होत असते, तेव्हा आघाडीच्या नेतेपदासाठी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांचे नाव पुढे येतात.

  काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. या संदर्भात राकाँ प्रमुख शरद पवारांनी म्हटले आहे की, भाजपचा मुकाबला करायचा असेल तर तिसऱ्या आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला सामील करावेच लागेल. भाजपविरोधी कोणतीही आघाडी स्थापन करायची झाल्यास त्या आघाडीला सामूहिक नेतृत्वाची आवश्यकता आहे, असेही पवार म्हणाले.

  तथापि, शिवसेनेने राहुल गांधींना न मागताच असा सल्ला दिलेला आहे की, जर भाजपविरोधी लढाई जिंकायची असेल तर पवारांना सोबत घ्यावेच लागेल. काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य दिनेश शया यांनीही शिवसेनेच्या सल्ल्याचे समर्थन करताना म्हटले की, राहुल गांधींना राकाँप्रमुख शरद पवारांना सोबत घ्यावेच लागेल.

  For the third front time is never the same where the Congress party was and now it is tough