पुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत! कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध?

सर्वांत जास्त संक्रमित कोईम्बतूर येथे आढळून आले आहेत. चेनई येथे १८२, चेंगळपेट येथे १२२, इमोहमध्ये ११५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकमध्येसुद्धा १२२९ नवीन कोरोनारुग्ण आढळून आले आहेत.

    महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे आता ही महामारी आटोक्यात येत असल्याचे वाटायला लागले असतानाच कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्‍त केला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे.

    दरम्यान केरळसारख्या लहान राज्यात ५ दिवसांमध्ये १.५ लाख नवीन कोरोनाबाधितांची प्रकरणे पुढे आलेली आहेत. महाराष्ट्रात शनिवारी ४८३१ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. आहेत. आता महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या ६४५२२७३ झालेली आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे नव्याने १२६ जणांचे निधन झालेले आहे, त्यामुळे आता कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख ३७ हजारावर पोहोचली आहे.

    मिझोराममध्ये मागील २४ तासात ८८८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून तामिळनाडूमध्ये १ हजार ५५१ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. सर्वांत जास्त संक्रमित कोईम्बतूर येथे आढळून आले आहेत. चेन्नई येथे १८२, चेंगळपेट येथे १२२, इमोहमध्ये ११५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकमध्येसुद्धा १२२९ नवीन कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. यावरून कोरोना महामारी पुन्हा आपले घातक रूप घेऊन येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

    हे सर्व पाहू जाता महाराष्ट्र आणि केरळमध्ये पुन्हा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र आणि केरळ सरकारला रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केलेली आहे.

    जगात अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक कोरोनारुग्ण आहेत. अशा परिस्थितीत शाळा-महाविद्यालये, सिनेमागृहे सुरू होण्याची शक्‍यता धुसर झालेली आहे. महाराष्ट्र सरकार सरकारी रुग्णालयात मूलभूत सोयीसुविधा अधिक प्रभावशाली करण्यासाठी ५ हजार कोटी रुपयाचे कर्ज घेऊन ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकांसह अन्य सोयीसुविधा उपलब्ध करू शकेल.