दणका! जम्मू-काश्‍मीरला दाखवला वेगळा देश; ट्विटरची भारताच्या नकाशासोबत छेडछाड

ट्विटर भारताच्या नकाशासोबत अशा प्रकारची छेडछाड करीत आहे की, त्या फालतूपणाला कोणीही भारतीय व्यक्‍ती कधीही सहनच करणार नाही. या सोशल मीडियाने ज्मू- काश्मीरचे नुकतेच जे चित्र प्रसिध्द केले आहे, त्यामध्ये या प्रदेशाला स्वतंत्र राज्य दाखविण्यात आले आहे.

    भारताच्या नकाशासोबत अशा प्रकारची छेडछाड करणे म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वाशी खेळ करण्यासारखेच आहे. जेव्हा ट्विटरच्या या आगाऊपणाबद्दल सर्वत्र विरोध झाला, तेव्हा ट्विटरने सोमवारी रात्री उशिरा जम्मू काश्मीर आणि लडाखला स्वतंत्र देश दाखविणारा नकाशा त्यांच्या वेबसाईटवरून काढून टाकण्यात आला. ट्विटरला भारतीय आयटी कायद्यानुसार वागण्याचे निर्देश दिल्यानंतरही ट्विटर असा फालतूपणा करीत आहे.

    काही दिवसापूर्वी ट्विटरने केंद्रीय सूचना आणि प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक केले होते. कोणत्याही देशाच्या नकाशासोबत अशा प्रकारचा फालतूपणा केल्याने जनतेच्या भावना दुखावतात. जर ट्विटरने बुध्दीपुरस्सर असे केले असेल तर हा गंभीर अपराध आहे. ट्विटरचा हा आगाऊपणा केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने गंभीरतेने घेतला असून ट्विटरवर कायदेशीर कारवाई करण्याकरिता विधी मंत्रालयाचा सल्ला घेण्यात येत आहे. या प्रकरणी ट्विटरला कायदेशीर नोटीसही दिल्या जाऊ शकते.

    भारतीय कायद्याचे पालन न केल्याबद्दल ट्विटरसोबत जो वाद निर्माण झाला होता, त्यावरून ट्विटरचे तक्रार निवारण अधिकारी धमेंद्र चतुर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागेवर कॅलिफोर्नियाचे जर्मी केसेल यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. भारताच्या नकाशासोबत छेडछाड करण्याची ट्विटरची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी लेहला चीनचा भाग असल्याचे नकाशात दाखविले होते.

    नवीन प्राद्योगिक नियमावरून अमेरिकेच्या या कंपनीचा भारत सरकारसोबत वाद सुरू आहे. भारत सरकारने बुध्दिपुरस्सररित्या भारतीय नियमाकडे कानाडोळा करीत असल्याबद्दल ट्विटरवर टीकास्त्र सोडले आहे. अशा परिस्थितीत ट्विटरचा वापर करणाऱ्यांच्या कोणत्याही बेकायदेशीर पोस्टबाबत ट्विटरच जबाबदार राहील.

    Jammu and Kashmir was shown as a separate country Twitter tampers with map of India