हे शक्य होईल का? शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी

मुंबईच नव्हे तर जगातील अनेक मोठ्या शहरांची हीच अवस्था आहे. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क, शिकागो आपल्या स्काय स्क्रॅपरसाठी ओळखले जातात. जिथे समुद्राने वेढलेला भाग आहे व विकास करण्याची शक्‍यता नसते तेव्हा उंच इमारती बनविण्याचा सार्थ पर्याय उरतो.

    महाराष्ट्राचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी एक अनोखा विचार व्यक्‍त करत म्हटले आहे की, मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये जागेची कमतरता पाहता सरकार व्हर्टिकल युनिव्हर्सिटी उघडण्यावर विचार करण्यात येत आहे.

    नवभारतच्या एज्युकेशन अवॉर्ड समारोहात त्यांनी सांगितले की, मोठ्या शहरांमध्ये विद्यापीठांसाठी कमीत कमी १० ते १५ एकर जमिनीची आवश्यकता असते. तुलनेत व्हर्टिकल युनिव्हर्सिटीमध्ये उंच उंच बहुमजली इमारतीत जागतिक पातळीचे अभ्यासक्रम आयोजित करण्यात येऊ शकतात, ज्यामुळे शिक्षणाचा स्तर उंचावेल. हा निर्णय अत्यंत उपयोगी व तर्कसंगत आहे.

    जेव्हा गगनचुंबी इमारतीत विद्यापीठे साकार होऊ शकतात, तर अनेक एकरात पसरलेल्या परिसराची आवश्यकता काय आहे ? कोरोना आपत्तीने तर अशा मोठ्या भूखंडांवर उभारलेल्या मोठ्या शाळा, महाविद्यालयांच्या उपयोगितेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे, जे ऑनलाईन शिक्षणामुळे गेल्या दीड वर्षांपासून रिक्त पडले आहेत. तसेच कोचिंग क्लासेससोबत टायअप असल्यामुळे कॉलेजमधील वर्ग रिकामे पडले होते.

    जागेची कमतरता एक प्रमुख कारण आहे जे शहरांचा व्हर्टिकल विकास करीत आहे. मुंबईच नव्हे तर जगातील अनेक मोठ्या शहरांची हीच अवस्था आहे. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क, शिकागो आपल्या स्काय स्क्रॅपरसाठी ओळखले जातात. जिथे समुद्राने वेढलेला भाग आहे व विकास करण्याची शक्‍यता नसते तेव्हा उंच इमारती बनविण्याचा सार्थ पर्याय उरतो. कितीतरी शहरांचा अधिकांश विस्तार झाल्यानंतर अशी स्थिती येते की, व्हर्टिकल ग्रोथ पर्यायाचा अवलंब करावा लागतो.

    उपराजधानी नागपूरमध्येही अशी स्थिती येत आहे. येथे कृषी विद्यापीठ शहराच्या मधोमध मोठ्या जमिनीवर विस्तारले आहे. शेत शहराच्या बाहेर नेऊन या मौल्यवान जमिनीचा पर्यायी उपयोग होऊ शकत नाही?

    शिक्षणमंत्री सामंत यांचा संकेत राज्याच्या अन्य मोठ्या शहरांसाठीदेखील ग्राह्य होऊ शकतो. तुरुंगासाठीदेखील शहराच्या मधोमध एवढी मोठी जमीन कशाला हवी? एकतर त्याला व्हर्टिकळ बनवायला हवे किंवा शहरापासून दूर घेऊन जायला हवे. शहर योजनेत नेहमी भविष्याचा रचनात्मक विचार असायला हवा.