On the one hand the joy of being kissed and on the other hand the wife understood the news of her husbands death during the presentation

नागपूरच्या जवळ असलेल्या कामठी आणि हिंगणा या शहरांना नागपूर पोलिस आयुक्तालयात सहभागी करून घेण्यात आले. यापूर्वी ही शहरे ग्रामीण विभागात होती. शहराच्या या विस्ताराबरोबरच गेल्या काही वर्षात नागपूर शहरातील गुन्हेगारीत वाढ झालेली आहे.

इ. स. २०१९ मध्ये राष्ट्रीय अपराध ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नागपूर शहर हे महाराष्ट्रातील गुन्हेगारांची राजधानी असून देशातील गुन्हेगारीमध्ये हे शहर दुस-या क्रमांकावर आहे. नागपूर शहराची ही स्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. नागपूर शहर देशाच्या मध्यभागी असून येथे गुन्हेगाराचा जमाव मोठ्या प्रमाणावर होतो. याशिवाय शहरांचे औद्योगिकरण होते, त्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण नेहमीच वाढत असते. उदाहरणच द्यायचे झाल्यास मुंबईचे देता येईल. इ.स. १९७० मध्ये मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत वाढली. इ.स. १९९० मध्ये पुणे शहराचीही तिच अवस्था झाली. जेव्हा एखादे शहर महानगरात परावर्तीत होत असते तेव्हा त्याबरोबरच तेथे दुही वाढ असते. ज्या शहराची लोकसंख्या वाढते, तेव्हा शहराच्या आयुक्ताचीही विभागणी होत असते, परंतु नागपूर शहरात मात्र असे काहीही झालेले नाही. याउलट नागपूरच्या जवळ असलेल्या कामठी आणि हिंगणा या शहरांना नागपूर पोलिस आयुक्तालयात सहभागी करून घेण्यात आले.

यापूर्वी ही शहरे ग्रामीण विभागात होती. शहराच्या या विस्ताराबरोबरच गेल्या काही वर्षात नागपूर शहरातील गुन्हेगारीत वाढ झालेली आहे. गेल्या ६ वर्षापासून महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद हे नागपूर शहराकडेच आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते होते तर आता महाविकास आघाडी सरकारमध्ये नागपूरचेच अनिल देशमुख यांच्याकडे राज्याचा गृहविभाग आहे. देशमुख यांच्या अथक प्रयत्नानंतरही शहरातीळ गुन्हेगारीवर कोणताही अंकुश लागलेला नाही. नेते, पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये असणा-या संगनमतामुळे गुन्हेगारांवर अंकुश लावणे कठीण होते. हे संगनमत तोडण्याचे बरेच प्रयत्न झाले. काही अंशी ते तुटलेही, परंतु पूर्णपणे ते न तुटल्यामुळे गुन्हेगारी संपुष्टात आणणे कठीण झाले आहे. इ.स. २०१९ मध्ये नागपूर शहर गुन्हेगारीमध्ये देशात दुस-या क्रमांकावर आहे. गुन्हेगारी पूर्णपणे संपवता येत नसली तरी ती कमी करता येऊ शकते.