Rajinikanth reversed his decision to enter politics why nrvb
रजनीकांतचे “नो पॉलिटिक्स? का?

प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण राजकारणात येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रकृती चांगली नसताना व अधिक वय झाल्यानंतरही कित्येक पुढारी राजकारणात सक्रिय आहेत, हे रजनीकांतला कोण सांगेल ? लालूप्रसाद यादव यांची किडनी केवळ २५ टक्केच कार्य करीत आहे, परंतु ते तुरूंगातून राजकारणाचे सूत्रसंचालन करीत असतात. शरद पवारांचे वय ८० वर्षे आहे. या वयातही ते राजकारणात सक्रिय आहेत. ७० वर्षे वयाचे पंतप्रधान मोदींनी सुद्धा बंगलची विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन रवींद्रनाथ टागोरांसारखी दाढी वाढविली आहे.

दक्षिण भारताचे चित्रपट अभिनेते ते मुपरस्दार रजनीकांत यांनी राजकारणात येण्याचा त्यांचा मागे घेतला. टक्कल पडलेल्या व्यक्तिच्या डोक्यावर आगपेटीची काडी घासून ती जाळणे किंवा सिगारेट पेटवून ती हवेत फेकून तोंडात पकडणे हे कारनामे राजकारणात उपयोगी पडत नाही. चित्रपटातील जीवन आणि वास्तव जीवनात खूप फरक असतो. हे लक्षात घेऊनच रजनीकांत यांनी राजकारणात येण्याचा त्यांचा निर्णय मागे घेतला असावा.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण राजकारणात येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रकृती चांगली नसताना व अधिक वय झाल्यानंतरही कित्येक पुढारी राजकारणात सक्रिय आहेत, हे रजनीकांतला कोण सांगेल ? लालूप्रसाद यादव यांची किडनी केवळ २५ टक्केच कार्य करीत आहे, परंतु ते तुरूंगातून राजकारणाचे सूत्रसंचालन करीत असतात. शरद पवारांचे वय ८० वर्षे आहे. या वयातही ते राजकारणात सक्रिय आहेत. ७० वर्षे वयाचे पंतप्रधान मोदींनी सुद्धा बंगलची विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन रवींद्रनाथ टागोरांसारखी दाढी वाढविली आहे.

अमित शाह यांना कोरोना झाला होता, परंतु कोरोनातून दुरूस्त झाल्यानंतर ते नव्या दमाने कामाला लागले आहेत. रजनीकांतला राजकारणात राहिले पाहिजे. सोनिया गांधी यांची प्रकृती चांगली नसते, तरीही त्या काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. अभिनेता या शब्दातील पहिले दोन अक्षरं काढून टाकल्यानंतर नेता शिल्लक राहतो आणि ॲक्टिंग तर राजकारणात फार उपयोगाची असते.

हिमाचल प्रदेशात गेल्यानंतर तेथे टोपी घाला. उत्तरप्रदेशात गेल्यानंतर तेथे मला गंगामाईने बोलावले आहे, असे म्हणा. पण रजनीकांत स्पष्टवक्‍ते आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते राजकारण करून जनतेला न्याय देऊ शकणार नाही असे त्यांना वाटल्यामुळे त्यांनी राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला.

रजनीकांत यांनी राहुल गांधीपासून काहीतरी शिकायला हवे. रजनीकांतही राहुलप्रमाणे ‘पार्टटाईम’ राजकारण करू शकत होते. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते सुटी घेऊ शकले असते. दक्षिण भारताच्या राजकारणात सक्रियता दाखविणाऱ्या एमजीआर आणि जयललिता यांची परंपर आता कोण चालविणार ? खरं म्हणजे त्यांच्यासाठी मैदान खुले होते. ते मागे हटले तर कमल हसन यांना संधी मिळेल. रजनीकांतला किंग बनायचे नसेल तर त्यांनी किंगमेकरची भूमिका पार पाडायला हवी. त्यांनी स्वतः निवडणूक लढवू नये पण पक्ष स्थापन करून इतर लोकांना मार्गदर्शन केले पाहिजे.