Sonia and Rahul gandhi were absent from the Congress Foundation Day function nrvb

काँग्रेसचा स्थापना दिन नुकताच साजरा करण्यात आला, परंतु स्थापनादिनाच्या कार्यक्रमाला पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी मात्र अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाचे वरिष्ठ नेते एके. अँटोनी यांनी पक्षाचा झेंडा फडकविला.

गांधी कुटुंबीयाशिवाय काँग्रेसचे पान हलत नाही. परंतु पक्षाच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमाला मात्र हे दोन्ही नेते गैरहजर होते. या दोन्ही नेत्यांना पक्षाच्या स्थापनादिनाचे महत्व कळले नाही की बुद्धिपुरस्सर ते या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते!

काँग्रेस पक्षाचा प्राण केंद्रीय सत्तेतच असतो, परंतु जेव्हापासून काँग्रेसने केंद्राची सत्ता गमावली, तेव्हापासून हा पक्ष निर्जीव झालेला आहे. या पक्षात कोणताही उत्साह दिसून येत नाही. इ.स. १८८५ मध्ये इटावाचे तत्कालिन जिल्हाधिकारी अल्बर्ट आक्टेव्हियन ह्यूम यांनी काँग्रेसची स्थापना केली. या पक्षाला १३६ वर्षे पूर्ण झालेली आहेत. काँग्रेसचा स्थापना दिन नुकताच साजरा करण्यात आला, परंतु स्थापनादिनाच्या कार्यक्रमाला पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी मात्र अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाचे वरिष्ठ नेते एके. अँटोनी यांनी पक्षाचा झेंडा फडकविला.

गांधी कुटुंबीयाशिवाय काँग्रेसचे ‘पान हलत नाही. परंतु पक्षाच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमाला मात्र हे दोन्ही नेते गैरहजर होते. या दोन्ही नेत्यांना पक्षाच्या स्थापनादिनाचे महत्व कळले नाही की बुद्धिपुरस्सर ते या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते! कोणत्याही पक्षाच्या स्थापनादिनाला अत्यंत महत्व असते आणि पक्षाचे वरिष्ठ नेते स्थापनादिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारत असतो.

सोनिया गांधी यांना त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्याच्या कारणावरून डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास मनाई केलेली आहे. कोरोना संक्रमणाच्या या काळात त्यांचे या कार्यक्रमाला गैरहजर राहणे एकदाचे योग्यच आहे, परंतु राहुळ गांधींनी मात्र हजर राहणे आवश्यक होते. ऐन स्थापनादिनाच्या कार्यक्रमाच्या वेळीच ते विदेश दौ-यावर निघून गेले.

काँग्रेस महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, ते त्यांच्या म्हाताऱ्या आजीची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी इटलीला गेलेले आहेत. खरं म्हणजे राहुल आणि सोनिया गांधी यांनी पक्षाच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमाला हजर राहणे किंवा गैरहजर राहणे ही त्यांची खासगी बाब आहे, परंतु त्यांच्या गैरहजेरीमुळे भाजपला त्यांच्यावर टीका करण्यासाठी आणखी एक मुद्या मिळालेला आहे. केंद्रीयमंत्री गिरीराजसिंग म्हणाले की, राहुल गांधी जेव्हा केव्हा भारतात सुटीवर येतात, तेव्हा ते विरंगुळा म्हणून राजकारणही करतात. सुट्या संपताच ते पुन्हा विदेशात निघून जातात.