तामिळनाडू सरकारने केली राजीव गांधींच्या मारेकऱ्याला ३० दिवसांची सुट्टी मंजूर!; यावर काय असेल काँग्रेसची प्रतिक्रिया

तामिळनाडूमधील काँग्रेस समर्थित सरकारने दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांच्या मारेकऱ्याला ३० दिवसांची सुटी मंजूर केली.

    राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॉलिन यांनी सुटीचा निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेस पक्षासोबत चर्चा केली नाही जेव्हा की, काँग्रेस पक्ष स्टॅलिन यांच्या सरकारमध्ये सहभागी आहेत. यापूर्वीच्या तामिळनाडूमधील अण्णाद्रमुक सरकारनेही राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना पॅरोलवर सोडण्याचीही हिंमत केली नव्हती. गेल्या तीन दशकापासून आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या या मारेकऱ्यांच्या सुटकेच्या अर्जावर राज्यपालांनीसुद्धा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

    मारेकऱ्याचा सुटकेचा अर्ज राज्यपालांकडे प्रलंबितच होता. केंद्र सरकारकडूनही राजीव गांधींच्या मारेकऱ्याला सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश राज्यपालांना देण्यात आले नव्हते. अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राजीव गांधी यांचे मारेकरी ए. जी. पेरारीवलनला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला. पेरारीवलन यांच्या आरोग्याचा हवाला देऊन त्यांची आई अर्जुथम्मल यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पत्राद्वारे विनंती केली होती की, देशातील कोरोना महामारीची स्थिती पाहू जाता आपल्या मुलाची काही दिवसासाठी तुरुंगातून सुटका करण्यात यावी.

    गांधी कुटुंबीयांनी राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफ केल्याचे बोलल्या जात आहे, परंतु यामध्ये किती सत्यांश आहे ? दुसरीकडे कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की, आजीवन कारावास म्हणजे केवळ १४ वर्षांचा तुरुंगवास नव्हे तर संबंधित आरोपीला जीवनभर कारावासाची शिक्षा. परंतु आजीवन कारावासाच्या कैद्याने तुरुंगात चांगले आचरण केले तर त्याची १४ वर्षाच्या तुरुंगवासानंतर सुटका केली जाते. आता राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याला मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सरकारने सुटी मंजूर केलेली आहे, यावर काँग्रेसची काय प्रतिक्रिया राहील? राजीव गांधी हत्याकांडातील अन्य आरोपींनाही आता सुटी देण्यात येणार आहे का? स्टॅलिन यांचे हे पाऊल लिट्टेच्या प्रति मवाळ धोरणाचे प्रतीक आहे का?

    Tamil Nadu government grants 30 days leave to Rajiv Gandhis assassin What will be the reaction of the Congress