उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग याची क्रूरता; लोकांच्या यातनाचं काय?

कोणताही हुकूमशहा राक्षसच असतो. कोणाचाही जीव घेण्यास त्याला पाशवी आनंद मिळत असतो. हिटलरने लाखो यहुद्यांना यातना शिबिरात ठेवले होते. उत्तर कोरियाचे सनकी आणि क्रूर हुकूमशहा किम जोंग यांनी जनतेला भयभीत करण्यासाठी त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले. जोंगपेक्षाही त्याची बहीण क्रूर आहे, असे बोलल्या जाते.

  कित्येकांना गॅस चेंबरमध्ये डांबून ठार मारण्यात आले. युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन यांनी केवळ नरसंहारच केला नव्हता तर मानवाचे मांस खाणारे ते नरभक्षकच होते. इदी अमीनने त्यांच्या देशात राहणार्‍या भारतीयांची जमीन, संपती आणि घरेदारे जप्त करून त्यांना युगांडामधून हाकलून देण्यात आले होते.

  इदी अमीनच्या अत्याचारापासून बचाव करण्यासाठी कित्येक भारतीय इंग्लंडमध्ये पळून गेले होते व तेथे नव्याने त्यांनी आपल्या जीवनाला सुरुवात केली. चीनमध्ये लोकशाहीची स्थापना करण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थ्यान-आन-मेन चौकात तेथील हुकूमशहांनी गोळ्या घालून ठार केले होते.

  हाँगकाँगमध्येही आंदोलनकर्त्यांवर चीन सरकारने अत्याचार केले होते. उत्तर कोरियाचे सनकी आणि क्रूर हुकूमशहा किम जोंग यांनी जनतेला भयभीत करण्यासाठी त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले. जोंगपेक्षाही त्याची बहीण क्रूर आहे, असे बोलल्या जाते. नुकतेच किम जोंगने त्यांच्या देशातील १० नागरिकांना भरचौकात गोळ्या घालून ठार केले. त्यांचा गुन्हा एव्हढाच होता की, या नागरिकांनी चिनी मोबाईलद्वारे जगातील अन्य देशांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.

  उत्तर कोरियामध्ये जगातील इतर देशांसोबत फोनवरून संपर्क साधण्यास बंदी आहे. गुप्तचर पोलिसांची यावर निगराणी असते. उत्तर कोरियातील अनेकांचे कुटुंबीय दक्षिण कोरियामध्ये राहतात. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ते तस्करीचे मोबाईल आणि सीमकार्डचा वापर करतात.

  उत्तर कोरियामध्ये खाद्यान्नाचे भीषण संकट आहे. या देशात प्रचंड उपासमारी आहे. दैनंदिन उपयोगांच्या वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहेत, परंतु सरकारी निर्बंधामुळे याबाबतीत कोणीही बोलताना दिसत नाही. हुकूमशहा किम जोंग मिसाईल आणि अण्वस्त्र तयार करण्यावरच मोठा खर्च करीत आहे. देशातील बहुतांश साधनसामग्री यावरच खर्च होत आहे.

  दक्षिण कोरियाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, परंतु उत्तर कोरियाला किम जोंग यांनी नरक बनवून टाकले आहे. येथील लोकांचा जगासोबतचा संपर्क तुटलेला असून ते कोणत्याही देशांकडे काहीही मदत मागू शकत नाही.

  The brutality of North Korean dictator Kim Jong Un What about peoples suffering