राममंदिराची पाइलिंग चाचणी अपयशी, १००० वर्षांची गॅरंटी नाही

मंदिराचे आयुर्मान वाढविण्यासाठी सिमेंटमध्ये अभ्रक व कोळशाबरोबरच आणखी काही केमिकल मिळविण्यावर विचारविनिमय सुरू आहे. भारतात आजदेखील अनेक शतकांपूर्वीची पुरातन मंदिरे, महल व किल्ले आहेत, परंतु त्यांचु स्थापत्य शैली वेगळ्या प्रकारची होती.

आस्था कितीही अटळ असली म्हणजे ती एखाद्या वास्तूच्या निर्मितीसाठी पायाभूत आधारावर महत्त्वाची अयोध्येत बनविण्यात येणाऱ्या भव्य राममंदिरासाठी (Ram Mandir) जेव्हा पाइलिंग चाचणी करण्यात आली व ती अयशस्वी ठरली. भूगर्भात मोठे बीम किंवा स्तंभ उभारून ते किती टिकू शकतात किंवा नाही हे पाहण्यात येते. खूप खोलवर खोदल्यानंतर तिथी जमीन रेताळ मिळाली व खडक व कडक मातीचा पृष्ठभाग मिळाला नाही. त्यामुळे पायाला तशी मजबुती मिळू शकत नाही ज्यामुळे निर्माणानंतर मंदिर १००० वर्षे टिकू शकते. याचे कारण असे कौ, रामजन्मभूमीवर जिथे मंदिराचे निर्माण होत आहे, शवे पूत शरयू नदी वाहत असल्यामुळे तिथे खोदकामात रेतीचरेती .. नंतर शरयूने आपला प्रवाह बदलला.

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, देशभरातील भवननिर्मिती विशेषतज्ज्ञांनी राम मंदिरासाठी हजार वर्षांची लिखित . गॅरंटी देण्यास नकार दिला आहे. मंदिरासाठी बनविण्यात आलेली पाइलिंग टेस्ट आधीच अयशस्वी झाली आहे. टेस्ट पिलरवर लोड दिल्यानंतर मजबुतीची पारख करण्यासाठी भूकंपासारखे झटके देण्यात आले, त्यात भेगा पडल्या व ते लचकले. जर पिलरच मजबूत नसतील, तर निर्मितीकार्य शतकानुशतके कसे टिकेल? चंपत राय यांनी सांगितले की, मंदिराचे १००० वर्षे आयुर्मान ही फक्त कल्पनाच आहे. जर ३००-४०० वर्षांची गॅरंटी मिळाली, तरी आम्ही निर्मितीसाठी सहमत आहोत.

मंदिराचे आयुर्मान वाढविण्यासाठी सिमेंटमध्ये अभ्रक व कोळशाबरोबरच आणखी काही केमिकल मिळविण्यावर विचारविनिमय सुरू आहे. भारतात आजदेखील अनेक शतकांपूर्वीची पुरातन मंदिरे, महल व किल्ले आहेत, परंतु त्यांचु स्थापत्य शैली वेगळ्या प्रकारची होती. जिथे जमीन रेताळ व भुसभुशीत असेल, तिथे मजबूत पाया कसा टाकला जाईल. खजुराहो मंदिर चंदेल वंशजांच्या काळात बनविले होते. ओडिशाचे सम मंदिर अतिशय प्राचीन आहे. दक्षिण भारताची मंदिरे अनेक शतकांपूर्वीची आहेत. प्राचीन निर्माण कला भार आधारित (लोड बेअरिंग)होती, परंतु आता आधुनिक निर्माण कार्य आरसीसी (स्थिनफोर्स्ड सिमेंट क्राक्रिट) पद्धतीने होत आहे.

जगात जिथे स्वामीनारायण मंदिर बनले आहेत, तिथे धातुचा वापर न करता दगडाला दगड जोडून मंदिरे तयार करण्यात आली आहे. अशा नक्षीदार भव्य मंदिरांमध्ये गुजरातमधीळ वडोदराजवळील अक्षरधाम, दिल्ली, नागपूर व लंडन-अमेरिकेतील मंदिरांचा समावेश आहे. अयोध्येच्या भव्य राममंदिरामध्येही दगडाला दगड जोडण्यात येतील व लोखंडाचा उपयोग करण्यात येणार नाही. परंतु पाइलिंग चाचणी अयशस्वी झाल्यामुळे अडचण आली आहे. आता विशेषतज्ज्ञांना या समस्येच्या निराकरणासाठी उपाय शोधावा लागेल.