विकासाला किती प्राधान्य?, इ. स. २०२४ ची निवडणूक पुन्हा राममंदिरावर!; यांना फक्त लोकांना सेंटी करणं एवढंच चांगलं जमतं आणि लोकही त्याला भूलतात

हे तेवढेच खरे आहे की, निवडणुकीच्या वेळी देशातील जनता विकासाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांऐवजी भावनात्मक मुद्द्यांनाच अधिक महत्त्व देत असते.

  भावनात्मक मुद्देच त्यांची प्राथमिकता असते आणि म्हणूनच गोरक्षण आणि मंदिर निर्माणासारखे मुद्दे जनतेला प्रभावित करीत असतात. विशेषतः धर्म आणि आस्थेला प्राधान्य देणार्‍या महिला तसेच ग्रामीण मतदार यामुळे अधिक प्रभावित होतात. विकासाच्या मुद्दयावर मतं मिळण्याची खरं तर खात्री नसतेच. डॉ. मनमोहनसिंग यांच्या संपुआ सरकारने कितीतरी योजना सुरू केल्या होत्या. त्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पूर्ण झालेल्या आहेत.

  डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपदाच्या त्यांच्या कार्यकाळात अनेक योजना आणि प्रकल्प सुरू केले असतानाही इ. स. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेस सत्तेवर येऊ शकली नाही. या विकास योजनामुळे आपल्याला किती सुविधा मिळाल्या आणि आपल्या जीवनात किती बदल झाला याचा विचार जनता करीत नसते. ते सरकारचे कामच असते आणि सरकारने त्यांचे काम केले, अशी लोकांची भावना असते.

  खरं म्हणजे निवडणुकीमध्ये मते भावनात्मक मुद्दयावरच मिळच असतात. कुंभमेळा, चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा इत्यादीकडे जनता भावुकतेने बघते. ती त्यांची आस्था असते. भाजपासारखा राजकीय पक्ष आणि विश्‍व हिंदू परिषदेसारखी संघटना जनतेच्या या आस्थेला मतदानामध्ये परावर्तित करीत असते. हे तेवढेच खरे आहे की, कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालेला आहे, तथापि, विकास योजनांची कामे मात्र सुरूच आहेत.

  जनतेला आयुष्मान योजना आणि उज्ज्वला योजनेचे फायदे मिळालेले आहेत. या योजना जनकल्याणासाठीच तयार करण्यात आलेल्या आहेत. तथापि, सत्तारूढ पक्षाला मात्र निवडणुकीमध्ये या योजनांमुळे जनता आपल्यालाच मतदान करतील याची शाश्‍वती नसते. भाजपाने अयोध्येत राममंदिराची निर्मिती आणि कलम ३७० रद्द करण्याचे जे आश्‍वासन दिले होते, ते पूर्ण केलेले आहे.

  अयोध्येत राममंदिराचे बांधकाम सुरू असून इ. स. २०२३ पर्यंत ते पूर्ण होऊन राममंदिर जनतेसाठी खुले करण्यात येईल. आता भाजपा इ. स. २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये याचे श्रेय निश्चित घेईल. देशातील करोडो लोकांची आस्था राममंदिराशी जुळलेली आहे. त्यामुळे भाजपा आगामी निवडणुकीत विकास केल्याचे तर सांगतीलच परंतु सर्वांधिक भर राममंदिरावर देतील. म्हणजेच पुन्हा एकदा आगामी इ. स. २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक भाजपा राममंदिराच्या मुद्दयावर लढविण्याची शक्‍यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे.

  What is the priority of development? in 2024 elections on Sentimental issue of Ayodhya Ram Mandir again