फ्लिपकार्ट आणि Moj ने व्हिडिओ आणि लाइव्ह कॉमर्ससाठी एकत्र येत असल्याची केली घोषणा

मोजकडे (Moj) अत्यंत सक्रिय अशा १६० दशलक्षांहून अधिक सदस्य आहेत. त्यामुळे आजघडीला हे सर्वात मोठे भारतीय शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ व्यासपीठ आहे. लाखो नव्या ग्राहकांना ई-कॉमर्स (E-Commerce) उपलब्ध करून देत या सहकार्यातून मोज परिसंस्थेतील कंटेंट क्रिएटर्सनाही (Content Creators) लाभ मिळवून दिले जातील.

  • या सहकार्यामुळे फ्लिपकार्टला पुढील संभाव्य २०० दशलक्ष नव्या ग्राहकांना शॉर्ट फॉर्म कंटेंटच्या माध्यमातून जोडून घेणे शक्य होणार
  • इन-ॲप इंटिग्रेशनच्या माध्यामातून मोज वापरकर्त्यांना फ्लिपकार्टवर थेट उत्पादनांचा शोध घेणे आणि ते विकत घेणे शक्य होणार

बंगळुरु : फ्लिपकार्ट (Flipkart and Moj) या भारतातील एतद्देशीय ई-कॉमर्स बाजारपेठेने (E-Commerce) मोज (Moj) या भारतातील सर्वात मोठ्या एतद्देशीय शॉर्ट व्हिडिओ (short video) व्यासपीठसोबतच्या सहकार्याची घोषणा केली आहे. यातून व्यापक प्रमाणावर व्हिडिओ आणि लाईव्ह कॉमर्स अनुभवाला चालना देण्यात येणार आहे. यातून फ्लिपकार्टला देशात व्हिडिओ कॉमर्सची वृद्धी करत नव्या २०० दशलक्ष ई-कॉमर्स ग्राहकांना जोडून घेणे शक्य होणार आहे.

मोजकडे (Moj) अत्यंत सक्रिय अशा १६० दशलक्षांहून अधिक सदस्य आहेत. त्यामुळे आजघडीला हे सर्वात मोठे भारतीय शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ व्यासपीठ आहे. लाखो नव्या ग्राहकांना ई-कॉमर्स (E-Commerce) उपलब्ध करून देत या सहकार्यातून मोज परिसंस्थेतील कंटेंट क्रिएटर्सनाही (Content Creators) लाभ मिळवून दिले जातील. यासाठी नव्या व्यवसाय-आधारित उत्पन्न क्षेत्रांतून सखोल सामाजिक-आर्थिक परिणाम साधला जाईल.

रेडसीअरने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात असा अंदाज मांडण्यात आला आहे की २०२५ पर्यंत भारतात शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या लाइव्ह कॉमर्समधील मर्कंडाइजचे एकूण मूल्य ५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. कंटेंटवर आधारित व्यवसाय अनुभवाच्या या उदयोन्मुख विभागात ग्राहक आणि बाजारपेठेला अधिकाधिक रस निर्माण होऊ लागला आहे, हेच या वाढीतून दिसून येते.

तर, बेन ॲण्ड कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, दर चारपैकी तीन इंटरनेट वापरकर्ते (किंवा ६०० ते ६५० दशलक्ष भारतीय) २०२५ पर्यंत शॉर्ट-फॉर्म व्हिडिओज पाहतील. भारतातील विविध शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ व्यासपीठांपैकी मोजकडे सर्वाधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. एआय/एमएलमधील त्यांची तज्ज्ञता आणि कंटेंट रिकमेंडेशन इंजिनचे हे यश आहे.

मोजसोबतच्या सहकार्याबद्दल फ्लिपकार्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख रवी अय्यर म्हणाले, “भारतभरात आजघडीला प्राधान्यक्रमाचा कंटेंट फॉरमॅट म्हणून शॉर्ट-फॉर्म व्हिडिओजचा उदय झाल्याने व्हिडिओ आणि लाइव्ह कॉमर्सला मोठ्या प्रमाणात चालना देण्याची संधी आमच्यासाठी निर्माण झाली आहे. फ्लिपकार्ट आणि मोजमधील धोरणात्मक भागीदारी नव्या २०० दशलक्ष ई-कामॅर्स वापरकर्त्यांना आकर्षित करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल तसेच ब्रँड्स आणि विक्रेत्यांपासून कंटेंट क्रिएटर्सपर्यंत सर्व भागधारकांना फायदेशीर अशी परिसंस्थाही यातून उभी राहील. देशातील बहुविध सांस्कृतिक जडणघडण लक्षात घेता आणि प्रत्येक ग्राहकाला सर्वसमावेशक ई-कॉमर्स अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या प्रादेशिक भाषांमधील इंटरफेस अनुभवाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंतची ही दरी भरून काढण्याचे सातत्याने प्रयत्न करत आहोत. पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आमच्या व्यासपीठावर आणण्यात या इंटरफेसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इंडिक भाषांमधून मोजने व्यापक स्तरावर पोहोच मिळवली आहे. या भाषेमुळे मोजने या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. आजघडीला सर्वोत्तम तंत्रज्ञानाच्या साह्याने अगदी नवा ई-कॉमर्स अनुभव देण्याच्या वाटेवर आम्ही आहोत आणि देशभरातील लोकांना हे आवडेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.”

मोजची मुख्य कंपनी मोहल्ला टेक प्रा. लि.चे चीफ फायनान्शिअल ऑफिसर मनोहर सिंग चरण म्हणाले, “अगदी सुरुवातीपासून आमच्या ॲपने प्रचंड प्रगती केल्याने ते भारतातील अत्यंत उत्साही तरुणांचे माहेरघर झाले आहे. मोजमध्ये आमच्या प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी कंटेंट क्रिएटर्स आहेत आणि आमचा एक मुख्य प्रयत्न म्हणजे शाश्वत दीर्घकालीन संधी निर्माण करणे ज्यातून आमच्या क्रिएटर्स समुदायाला त्यांच्या अप्रतिम कंटेंटसाठी आर्थिक लाभ मिळतील. क्रीएटर अर्थव्यवस्थेतील महसूल स्रोतांची जगभरात प्रचंड वाढ होत आहे आणि फ्लिपकार्टसोबतच्या या सहकार्यातून भारतातील क्रिएटर्ससाठी एक भक्कम उत्पन्न मार्ग बनवण्याच्या दिशेने आम्ही ठोस पाऊल उचलले आहे. त्याचवेळी या व्यासपीठावरील आमच्या वापरकर्त्यांसाठी एक उत्तम सामाजिक अनुभवही तयार होत आहे. पर्सनलाइज्ड मार्केटिंगच्या दिशेने क्रीएटिव्ह इन-ॲप इंटीग्रेशनसाठी एक नवे अवकाश यामुळे खुले होईल. कंटेंट आणि कॉमर्समध्ये सहज मेळ साधला गेल्याने ब्रँडसना आता आपल्या ग्राहकांसोबत कसे जोडून घेता येईल याचे नवे मार्ग सापडतील आणि भारतातील डिजिटल सोशल कॉमर्स क्रांतीला नवी प्रेरणा मिळेल.”

वैशिष्ट्ये

१. फ्लिपकार्ट आणि मोज एकत्र येत मोज व्यासपीठावर व्ह्यूइंग अनुभव अधिक समृद्ध करणार आहेत, कंटेंट क्रिएटर्सने दाखवलेली उत्पादने सहज आता उपलब्ध होतील

२. मोजवर वापरकर्त्यांना सहजसोपा कंटेंट आणि कॉमर्स अनुभव मिळेल, आता त्यांना व्हिडिओ स्क्रीनवरून थेट फ्लिपकार्ट मार्केटप्लेसवर प्रोडक्ट टॅग करता येतील