सॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही

घरातील मनोरंजनाला अधिकाधिक प्राधान्‍य दिले जात असताना मोठ्या स्क्रिन (Screen) आकाराच्‍या टीव्‍हींसाठी मागणी वाढत आहे. बिग टीव्‍ही फेस्टिवल (Big TV Festival) निवडक ५५ इंच व त्‍यावरील आकाराच्‍या निओ क्‍यूएलईडी (Neo QLED) व क्‍यूएलईडी टीव्‍ही (QLED TV) आणि ७२ इंच व त्‍यावरील आकाराच्‍या क्रिस्‍टल ४के यूएचडी टीव्‍हींच्‍या (Crystal 4K UHD TV) खरेदीवर वैध असेल.

  • मिळवा जवळपास १,०४,९०० रूपये किंमतीचा साऊंडबार मोफत
  • जवळपास २५ टक्‍के कॅशबॅक आणि ९९० रूपये इतक्‍या कमी रक्‍कमेपासून सुरू होणारे ईएमआय
  • सॅमसंगच्‍या 'बिग टीव्‍ही फेस्टिवल' आणि 'होम लाइक नेव्‍हर बीफोर' ऑफर्स
  • ऑफर्स २५ सप्‍टेंबर ते १० नोव्‍हेंबर २०२१ पर्यंत वैध असतील

नवी दिल्ली : आगामी सणासुदीच्‍या काळामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करण्‍यासाठी सॅमसंग (Samsung) या भारताच्‍या सर्वात मोठ्या व सर्वात विश्‍वसनीय ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने (Electronics Brands) त्‍यांच्‍या टीव्‍ही व डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर (On TV and digital appliances) दोन स्‍पेशल ऑफर्स लाँच (Special Offers Launch) केल्‍या आहेत – बिग टीव्‍ही फेस्टिवल (Big TV Festival) आणि होम लाइक नेव्‍हर बीफोर (Home Like Never Before). या आकर्षक उत्‍पादन ऑफर्स, तसेच आकर्षक फायनान्‍स योजनांसह कॅशबॅक, खात्रीदायी गिफ्ट्स व सुलभ ईएमआय देशभरातील सर्व प्रमुख ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स रिटेलर्समध्‍ये २५ सप्‍टेंबर ते १० नोव्‍हेंबर २०२१ पर्यंत वैध असतील.

घरातील मनोरंजनाला अधिकाधिक प्राधान्‍य दिले जात असताना मोठ्या स्क्रिन (Screen) आकाराच्‍या टीव्‍हींसाठी मागणी वाढत आहे. बिग टीव्‍ही फेस्टिवल (Big TV Festival) निवडक ५५ इंच व त्‍यावरील आकाराच्‍या निओ क्‍यूएलईडी (Neo QLED) व क्‍यूएलईडी टीव्‍ही (QLED TV) आणि ७२ इंच व त्‍यावरील आकाराच्‍या क्रिस्‍टल ४के यूएचडी टीव्‍हींच्‍या (Crystal 4K UHD TV) खरेदीवर वैध असेल. यामुळे तुम्‍हाला प्रि‍यजनांसोबत प्रि‍मिअम सिनेमॅटिक अनुभव, सर्वोत्तम मनोरंजन, सुधारित उत्‍पादकता व कनेक्‍टीव्‍हीटीचा आनंद घेता येईल.

या ऑफरसह ग्राहकांना निवडक टीव्‍हींच्‍या खरेदीवर जवळपास १,०४,९०० रूपये किंमत असलेला साऊंडबार मोफत मिळू शकतो, तसेच जवळपास २० टक्‍के कॅशबॅक, १,९९० रूपयांपासून सुरू होणारे ईएमआय, टीव्‍हींवर ३-वर्षे कम्‍प्‍लीट वॉरण्‍टी आणि निवडक क्‍यूएलईडी टीव्‍हींवर १०-वर्षे नो स्क्रिन बर्न-इन वॉरण्‍टीचा लाभ घेऊ शकतात.

सर्व उत्‍सव व साजरीकरण प्रामुख्‍याने घरीच साजरे केले जातात. ग्राहकांना त्‍यांचे घर सुशोभित करण्‍यासोबत स्‍टाइलमध्‍ये उत्‍सव साजरा करण्‍याचा आनंद देण्‍यासाठी सॅमसंगने त्‍यांचे रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, मायक्रोवेव्‍ह्ज आणि एअर कंडिशनर्सवर ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्स देखील सादर केल्‍या आहेत. या ऑफर अंतर्गत ग्राहक जवळपास २५ टक्‍क्‍यांपर्यंत कॅशबॅक, ९९० रूपयांपासून सुरू होणारे ईएमआय, निवडक मायक्रोवेव्‍ह्जवर मोफत बोरोसिल किट, ५-वर्षे कॉम्‍प्रेहेन्सिव्‍ह वॉरण्‍टी, निवडक एसींवर मोफत इन्‍स्‍टॉलेशन आणि विविध सॅमसंग ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्‍पादनांवर अतिरिक्‍त वॉरण्‍टीचा लाभ घेऊ शकतात.

”सणासुदीचा काळ ग्राहकांसाठी त्‍यांचे घर सुशोभित करण्‍याकरिता आणि आमच्‍यासाठी त्‍यांच्‍याशी कनेक्‍ट होण्‍याकरिता वर्षातील सर्वात महत्त्वपूर्ण काळ आहे. ग्राहक घरीच अधिक वेळ व्‍यतित करत असल्‍यामुळे त्‍यांची आवडींमध्‍ये बदल झाला आहे. ज्‍यामुळे प्रिमिअम सिनेमॅटिक अनुभव देण्‍यासोबत त्‍यांच्‍या लिव्हिंग रूमला आकर्षक लुक देणा-या मोठ्या स्क्रिन आकाराच्‍या टीव्‍हींसाठी मागणी वाढली आहे. तसेच मोठ्या क्षमतेचे रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स व मायक्रोवेव्‍ह्जसाठी मागणी देखील वाढली आहे. कुटुंबातील सदस्‍य घरामध्‍ये काम करण्‍यासोबत घरामधूनच मुलांचे शालेय शिक्षण सुरू असल्‍यामुळे दोन किंवा तीन एसी खरेदी केले जात आहेत. आम्‍ही बिग टीव्‍ही फेस्टिवलला पुन्‍हा सादर करण्‍यासोबत सेलिब्रेशन्‍सना अधिक स्‍पेशल व संस्‍मरणीय करण्‍यासाठी होम लाइक नेव्‍हर बीफोर ऑफर्स देखील सादर केल्‍या आहेत,” असे सॅमसंग इंडियाच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्‍यवसायाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष राजू पुल्‍लन म्‍हणाले.

सॅमसंगची वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन श्रेणी

सॅमसंग क्‍यूएलईडी टेलिव्हिजन्‍स

सॅमसंगचा क्‍यूएलईडी टीव्‍ही प्रिमिअम टीव्‍ही व कौटुंबिक मनोरंजनाचा स्‍तर उंचावतो. या टीव्‍हीमध्‍ये आकर्षक डिझाइनला साजेशी अशी सर्वात प्रगत पिक्‍चर क्‍वॉलिटी आहे. यामधील क्‍वॉन्‍टम डॉट तंत्रज्ञान टीव्‍हीची ब्राइटनेस पातळी वाढवते आणि प्रखर व सुस्‍पष्‍ट रंगसंगतींची निर्मिती करत निर्मात्‍यांना अपेक्षित असे प्रेक्षकांना उत्तम व्हिज्‍युअल अनुभव देते. क्‍यूएलईडी टीव्‍हींमध्‍ये ऑब्‍जेक्‍ट ट्रॅकिंग साऊंड (ओटीएस) आणि ॲक्टिव्‍ह वॉईस ॲम्‍प्‍लीफायर (एव्‍हीए) देखील आहे, ज्‍यामधून घरामध्‍येच सिनेमॅटिक अनुभव मिळण्‍याची खात्री मिळते.यासोबतच वन रिमोट कंट्रोलवरील नवीन बिक्‍स्‍बी व ॲलेक्‍सा वैशिष्‍ट्यासह युजर्सना वॉईस कंट्रोलची उत्तम सुविधा मिळते. अतिरिक्‍त कनेक्‍टर्स किंवा जटिल सेटअप्‍सशिवाय सर्व कनेक्‍टेड डिवाईसेसना कनेक्‍शन्‍सची खात्री मिळते.

सॅमसंग स्‍पेसमॅक्‍स फॅमिली हब

स्‍पेसमॅक्‍स फॅमिली हब संपूर्ण कुटुंबासाठी किचनला कनेक्‍टेड लिव्हिंग फन झोनमध्‍ये बदलतो. स्‍मार्टथिंग्‍ज इकोसिस्टिमसह कार्य करणारे होम कंट्रोल वैशिष्‍ट्य ग्राहकांना फॅमिली हब™ स्क्रिनमधून त्‍यांच्‍या कनेक्‍टेड अप्‍लायन्‍सेसवर नियंत्रण व देखरेख ठेवण्‍याची सुविधा देते. फूड मॅनेजमेंट वैशिष्‍ट्य दरवाजा उघडण्‍याशिवाय कधीही, कुठूनही फ्रिजचा आतील भाग पाहण्‍याची सुविधा देते.कौटुंबिक धमाल कधीच न थांबण्‍याच्‍या खात्रीसाठी होम एंटरटेन्‍मेंट उच्‍च दर्जाच्‍या स्‍पीकर्समधून संगीत ऐकण्‍याचा आनंद देते आणि या वैशिष्‍ट्याच्‍या माध्‍यमातून फॅमिली हब™ स्क्रिनवर स्‍मार्टफोनमधील कन्‍टेन्‍ट किंवा टीव्‍हीवरील मनोरंजन पाहता येते. कुटुंबासोबत व्‍यतित केला जाणारा वेळ अधिक सर्वसमावेशक करण्‍यासाठी कुटुंबातील सदस्‍य रेफ्रिजरेटर्सच्‍या टचस्क्रिनवरील दि फॅमिली कनेक्‍शन वैशिष्‍ट्याचा वापर करत त्‍यांचे वेळापत्रक ठरवू शकतात, फोटो शेअर करू शकतात आणि मजकूर संदेश पाठवू शकतात. ब्‍ल्‍यूटूथसह तुम्‍ही किचनमध्‍ये कूकिंग किंवा बेकिंग करताना कोणताही कॉल चुकवणार नाहीत. सॅमसंगचे वॉईस असिस्‍टण्‍ट बिक्‍स्‍बी व्‍यक्‍तीचे आवाज ओळखते आणि संदर्भांनुसार वैयक्तिकृत माहिती देते.

सॅमसंग कर्ड माएस्‍ट्रो रेफ्रिजरेटर्स

रेफ्रिजरेटर्सची कर्ड माएस्‍ट्रो™ रेंज सॅमसंगच्‍या ‘मेक फॉर इंडिया’ नाविन्‍यतांचा भाग आहेत आणि कंपनीला वर्षानुवर्षे भारतीय ग्राहकांच्‍या गरजांबाबत असलेल्‍या सखोल माहितीमधून ही रेंज तयार करण्‍यात आली आहे. हे रेफ्रिजरेटर्स दही बनवण्‍याच्‍या त्रासाला दूर करतात आणि फूड प्रीझर्व्‍हेशनपासून फूड प्रीपरेशनपर्यंत रेफ्रिजरेटरच्‍या पारंपारिक वापरामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. कर्ड माएस्‍ट्रो™ प्रत्‍येकवेळी त्‍याच प्रक्रियेने आरोग्‍यदायी व शुद्ध दही बनवतो आणि विविध वातावरणीय स्थितींमध्‍ये दही बनवण्‍याच्‍या समस्‍यांचे निराकरण करतो.सॅमसंगच्‍या कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटर्समधील दही बनवण्‍याच्‍या प्रक्रियेला कर्नाल येथील आयसीएआर- नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट (एनडीआरआय)ची मान्‍यता मिळाली आहे.

सॅमसंग मायक्रोवेव्‍ह्ज

सॅमसंगने खास भारतासाठी बनवण्‍यात आलेल्‍या मायक्रोवेव्‍ह ओव्‍हन्‍समध्‍ये नाविन्‍यता आणत भारतीय कूकिंगमध्‍ये क्रांतिकारी बदल आणला आहे. ग्राहक आता नवीन मायक्रोवेव्‍ह रेंजमध्‍ये रोटी/नान व दहीसह मसाला, तडका आणि सन-ड्राय फूड तयार करू शकतात.

सॅमसंग विंड फ्री एसी ३.०

सॅमसंगची विंड-फ्री ३.० यंत्रणा २३,००० सूक्ष्‍म-छिद्रांचा वापर करत खोलीच्‍या कानाकोप-यापर्यंत हवा पसरवते, ज्‍यामुळे संपूर्ण खोलीमध्‍ये थंडावा जाणवतो. इष्‍ट तापमानापर्यंत पोहोचल्‍यानंतर यंत्रणा एकसमान ताजी हवा पसरवते. विंड-फ्री ३.० यंत्रणा युजर्सना वाय-फायच्‍या माध्‍यमातून बिक्‍स्‍बीचा वापर करत त्‍यांच्‍या एसींवर नियंत्रण ठेवण्‍याची सुविधा देते. युजर दूरूनच एसीच्‍या कार्यसंचालनावर नियंत्रण ठेवू शकतात आणि लाइव्‍ह अभिप्रायासह कार्यसंचालन निर्धारित करू शकतात. एआय ऑटो-कूलिंग वापर व लिव्हिंग रूमच्‍या स्थितींनुसार थंडावा आपोआपपणे सानुकूल करते. तसेच वेलकम कूलिंग जिओ-फेन्सिंग वैशिष्‍ट्यांचा वापर करत युजरला लोकेशनवर पोहोचण्‍यापूर्वीच त्‍यांच्‍या पसंतीनुसार खोलीमध्‍ये थंडावा निर्माण करण्‍याची सुविधा देते.

सॅमसंग वॉशिंग मशीन्‍स

डिजिटल इन्‍व्‍हर्टर मोटर्स असलेल्या सॅमसंग वॉशिंग मशिन्‍स वापरादरम्‍यान कमी ऊर्जेचा वापर करतात. तसेच वॉशिंग मशिन सुरू असताना आवाज व स्‍पंदन देखील कमी होतात. हायजिन स्टिम कपडे स्‍वच्‍छ व सॅनिटाईज झाल्‍याची खात्री देते. हे वैशिष्‍ट्य ड्रमच्‍या तळामधून वाफ उत्‍सर्जित करत वॉशिंगचा दर्जा सुधारते. परिणामत: ड्रममधील प्रत्‍येक कपडा वेगवेगळा स्‍वच्‍छ धुतला गेल्‍याची खात्री मिळते. हायजिन स्टिम गडद डाग आणि ९९.९ टक्‍क्‍यांपर्यंत जीवाणू दूर करते.