प्रथमच फेसबुक जाहीर करणार कारवाईचा लेखाजोखा; किती तक्रारी आल्या? किती तक्रारींवर कारवाई केली?

26 मे रोजी देशभरात नवे आयटी नियम लागू करण्यात आले आहेत, त्यानुसार सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्यात तक्रारींचा अहवाल सादर करावा लागणार आहे. यात तक्रारी आणि त्यांचे निराकरण याविषयी माहिती असेल. तसेच या रिपोर्टमध्ये फेसबुकवरून काढून टाकलेल्या पोस्टची लिंक माहिती म्हणून नोंदविली जाईल.

    दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या माहिती तंत्रत्रान नियमांतर्गत फेसबुक प्रथमच 2 जुलै रोजी अंतरिम अहवाल जाहीर करणार आहे. या अहवालात 15 मे ते 15 जून दरम्यान फेसबुकवरून किती आपत्तीजनक माहिती (कंटेट) हटविण्यात आली, याबद्दल माहिती दिली जाणार आहे. याचबरोबर, वापरकर्त्यांकडून किती तक्रारी आल्या, त्यापैकी किती तक्रारींवर कारवाई करण्यात आली, याबाबतचा अहवाल फेसबुककडून 15 जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे.

    26 मे रोजी देशभरात नवे आयटी नियम लागू करण्यात आले आहेत, त्यानुसार सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्यात तक्रारींचा अहवाल सादर करावा लागणार आहे. यात तक्रारी आणि त्यांचे निराकरण याविषयी माहिती असेल. तसेच या रिपोर्टमध्ये फेसबुकवरून काढून टाकलेल्या पोस्टची लिंक माहिती म्हणून नोंदविली जाईल.

    नवे आयटी नियम हे डिजिटल प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करावे लागतात. तसेच, तक्रारींच्या लिंक्स तपासणीनंतर हटवावे लागतात. कंटेट 36 तासांच्या आत हटविणे आवश्यक आहे. तसेच अश्लील कंटेट 24 तासांच्या आत काढावे लागेल.