चिंगारी ॲपवर सार्वजनिक गणपतींचे दर्शन, एक अनोखा ऑनलाईन उपक्रम

गणेश चतुर्थी हा सकारात्मक ऊर्जा आणि सत्कार्य करण्याचा उत्सव असतो. नकारात्मक शक्तींचा नाश आणि चांगल्या गोष्टींची सुरुवात या महोत्सवातून प्रतीत होते. महोत्सव साजरा करण्यासाठी उत्साही असलेल्या लोकांच्या मदतीकरीता चिंगारीने #ChingariBappa ही स्पर्धाही सुरु केली आहे. हे कँपेन लाइव्ह असून याअंतर्गत लोक या सणातील त्यांचे व्हिडिओ आणि संदेश शेअर करू शकतील.

  मुंबई : गणेश चतुर्थीचा महत्त्वाचा उत्सव साजरा करण्यासाठी चिंगारी या भारतातील अग्रगण्य शॉर्ट व्हिडिओ ॲपने एक अनोखा ऑनलाईन उपक्रम राबवला आहे. गणेश मंडळांमध्ये जाऊन बाप्पाचे दर्शन घेण्यास उत्सुक भाविकांसाठी ॲपवरच सर्व प्रमुख मंडळाच्या गणपतींचे दर्शनाची सोय चिंगारी ॲपने केली आहे. चिंगारीच्या युझर्सना गणपती दर्शनासाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही, कारण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी देवच घरापर्यंत येत आहे.

  गणेश चतुर्थी हा भारतात साजरा होणारा भव्य महोत्सव अतुलनीय असतो. कोरोनाच्या साथीमुळे उत्सवाचा आनंद कमी झाला असून प्रवासावरही निर्बंध आहेत. त्यामुळेच चिंगारी आपल्या युझर्सना घरी राहूनच आरामात या सर्व गोष्टींचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. यासाठी ॲपने मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांशी करार केला आहे. याद्वारे लोकांना बाप्पाच आपल्या घरी येत असून आपल्याला आशीर्वाद देत आहेत, असा अनुभव चिंगारी ॲपद्वारे घेता येत आहे.

  चिंगारी ॲपचे सह संस्थापक आणि सीईओ सुमित घोष म्हणाले, ” युझर्सना अधिक अर्थपूर्ण अनुभव मिळावा, यासाठी चिंगारीने नेहमीच प्रयत्न केले आहेत. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही आघाडीच्या गणेश मंडळांशी करार केला असून लोकांना या उत्सवाचा आनंद घरी राहूनच घेता येईल. या करारामुळे आमच्या सर्व युझर्सना विविध मंडळाची सजावट, आरती, भजन एवढेच नव्हे तर घराबाहेर न पडता या उत्सवातील चैतन्यमय वातावरणाचा अनुभव घेता येईल.”

  गणेश चतुर्थी हा सकारात्मक ऊर्जा आणि सत्कार्य करण्याचा उत्सव असतो. नकारात्मक शक्तींचा नाश आणि चांगल्या गोष्टींची सुरुवात या महोत्सवातून प्रतीत होते. महोत्सव साजरा करण्यासाठी उत्साही असलेल्या लोकांच्या मदतीकरीता चिंगारीने #ChingariBappa ही स्पर्धाही सुरु केली आहे. हे कँपेन लाइव्ह असून याअंतर्गत लोक या सणातील त्यांचे व्हिडिओ आणि संदेश शेअर करू शकतील. यात पात्र होणाऱ्या सर्व युझर्सना चिंगारी कॉइन्स जिंकण्याची संधी मिळेल. यासोबतच स्पर्धेच्या विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत.आता पर्यंत या कॅम्पेनला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे, २०० करोड पेक्षा अधिक व्ह्यूज आणि क्रिएटर्सनी १५ हजाराहून अधिक व्हिडिओज तयार केले आहेत.

  चिंगारी ॲपचे सहसंस्थापक आणि सीओओ दीपक साळवी म्हणाले, उत्सवाला सुरुवात झाली असून चिंगारीने यानिमित्त विविध उपक्रम हाती घेतले आहेत. कंटेंट क्रिएटर्सना त्यांची संपूर्ण क्षमता वापरण्याची संधी देण्याचा प्रयत्न चिंगारीतर्फे नेहमीच करण्यात येतो. या कँपेनद्वारे लोक बाप्पाविषयीचे मनोरंजनात्मक आणि मौल्यवान व्हिडिओज तयार करतील, अशी आम्हाला आशा आहे. यामुळे सभोवताली सकारात्मकतेचा संदेश पसरेल आणि जास्तीत जास्त लोक या मोहिमेशी जोडले जातील, अशी आम्हाला आशा आहे.

  भारतीय बाजारात मागणी असलेल्या माहितीपूर्ण, आनंददायी आणि सृजनात्मक कंटेंटचा पुरवठा करण्याची चिंगारीची दीर्घकालीन परंपरा आहे. भरपूर मनोरंजनात्मक आणि मौल्यवान कंटेंटचा दृष्टीकोन याद्वारे प्रदान केला जातो. आघाडीच्या ब्रँडसोबत ॲपने करार केला असून कंटेंट निर्मात्यांनाही नेक्स्ट जनरेशनची साधने पुरवत सक्षम करण्यात आले आहे. जेणेकरून हा कलाकारांसाठीचा सर्वात मौल्यवान प्लॅटफॉर्म ठरेल.