google gmail down youtube docs outage reason what caused know everything about it
का गडगडल्या ४५ मिनिटांपर्यंत गुगलच्या सर्व्हिसेस?जाणून घ्या गुगलच्या साठवणुकीचं नवं धोरण

गडगडी दरम्यान अनेक युजर्सनी जीमेल काम करत नसल्याच्या तक्रारी केल्या, युट्युब चालत नाहीये, ड्राइव्ह ओपन होत नाहीये, गुगल मीट होत नाही आणि त्यानंतर गुगलवर अवलंबून असणाऱ्या हजारो कॉर्पोरेट्सने एकच कल्ला केला ना भाऊ.

जगभरात गुगलच्या सर्व्हिसेस १४ डिसेंबरच्या संध्याकाळी ४० मिनिटांपर्यंत गडगडल्या होत्या. लॉगइन आणि ॲक्सेस करण्यात येत होत्या अडचणी. भारतीय प्रमाणवेळेनुसार, संध्याकाळी जवळपास ५ : २५ च्या सुमारास सुरू झाली आणि संध्याकाळी ६ : १० वाजता पूर्ववत झाली. या दरम्यान गुगलच्या १९ सेवा ठप्प झाल्या होत्या. या गडगडी दरम्यान अनेक युजर्सनी जीमेल काम करत नसल्याच्या तक्रारी केल्या, युट्युब चालत नाहीये, ड्राइव्ह ओपन होत नाहीये, गुगल मीट होत नाही आणि त्यानंतर गुगलवर अवलंबून असणाऱ्या हजारो कॉर्पोरेट्सने एकच कल्ला केला ना भाऊ.

गुगलवर भरोसा ठेवणाऱ्यांबाबत तर बोलूच नका, खूपच अवघडल्यागत झालं होतं ना राव. गुगल डाऊन कसं काय होऊ शकतं. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या हजारो पोस्टमध्ये हा एकमेव प्रश्न होता. भलेही ४५ मिनिटांत गुगलने आपल्या सर्व्हिसेस पूर्ववत सुरू केल्या, पण गुगलच्या सर्व्हिसेस डाऊन झाल्याने बाजारात अफवांचं पीकच आलं होतं.

गुगलमध्ये नेमकं काय घडलं होतं?

स्टोरेज कोट्याच्या मुद्द्यावरून जवळपास ४५ मिनिटांसाठी गुगलच्या सर्व्हिसेस डाऊन झाल्या होत्या. या ४५ मिनिटांत युजर्सला त्यांची अकाऊंट्स ॲक्सेस करताच आली नाहीत. सर्व सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्या अशी माहिती गुगलच्या प्रवक्त्याने दिली. भविष्यात ही समस्या पुन्हा उद्भवू नये , म्हणून फॉलो-अप रिव्ह्यू करणार असल्याचं कंपनीने ठामपणे सांगितलं आहे.

याआधी गुगल वर्क स्पेस स्टेटस डॅश बोर्डने १४ डिसेंबरला संध्याकाळी ५ : २५ ला समस्या शोधण्यात यश आल्याचं सांगितलं आणि लवकरच ती दूर करणार असल्याचं सांगितलं. यात ५ : ४२ पर्यंत ही समस्या दूर होईल असं म्हटलं होतं. कदाचित याहून अधिकही वेळ लागण्याची शक्यता आहे. संध्याकाळी ६ : ४२ वाजता गुगलने अपडेट दिली की, जी मेलच्या सर्व सेवा रि-स्टोर करण्यात आल्या आहेत. तोपर्यंत गुगलच्या अन्य सेवाही रुळावर आल्या होत्या.

गुगलच्या सेवा गडगडल्याने किती जणांवर याचा परिणाम झाला ?

गुगलच्या सेवा गडगडल्याने फक्त जीमेल आणि युट्युबच्या ३५० कोटी जागतिक युजर्स प्रभावित झाले. कंपनीच्या सर्व सर्व्हिसेस आणि युजर्सला एकत्रच समस्या येणं असं फारच क्वचित घडतं.तथापि, प्रत्येक कंपनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या युजर्सला सर्व्हिसेस देण्यासाठी अनेक सर्व्हर्सचा वापर करते. या सर्व्हर्समध्येही अनेक प्रकारचे बॅकअप तयार करण्यात आले आहेत, जे काहीही समस्या समोर येताच तात्काळ सक्रिय होतात. यानंतरही १४ डिसेंबरला ज्या प्रकारे गुगलच्या सर्व्हिसेसवर परिणाम झाला, तो आजवर कधीच आला नव्हता. पीक अवरला डाउनडिटेक्टर.कॉमने जगभरातील वेगवेगळ्या भागांत १.१२ लाख इश्यू युट्युब आणि ४० हजार इश्यू जीमेलवर नोंदविले.

ही समस्या दूर करण्यासाठी गुगलने नेमकं काय केलं?

गडगडल्या नंतर यातून धडा घेत गुगलने जीमेल, गुगल ड्राइव्ह (गुगल डॉक्स, शीट्स, स्लाइड्स, ड्राईंग्स, फॉर्म्स आणि जॅमबोर्ड फाइल्स सह) आणि गुगल फोटोशी संबंधित आपल्या अकाऊंट्ससाठी नवीन स्टोरेज पॉलिसी घोषित केली आहे. या नव्या सर्व्हिसेस १ जून २०२१पासून लागू होतील. गुगलने आपल्या हेल्प सेंटर आर्टिकलमध्ये सांगितलं आहे की, यात सर्व्हिसेस प्रमाणे कशाप्रकारे बदल होणार आहे.

नवीन पॉलिसीत काय-काय असणार ?

जर तुम्ही दोन वर्ष जीमेल, ड्राइव्ह किंवा फोटो सर्व्हिसेसचा वापरच केला नाही तर गुगल तुमचं अकाऊंट डिलीट करणार आहे. ज्या गुगल वन मेंबर्सचा स्टोरेज डेटा लिमिटेड आहे, त्यांच्यावर नवीन इनॲक्टिव्ह पॉलिसी लागू होणार नाही, जर आपली स्टोरेज लिमिट दोन वर्षांपर्यंत जास्त असेल तर जीमेल, ड्राइव्ह आणि फोटोशी संबंधित कंटेंट गुगल डिलीट करणार आहे.

यामुळे तुमच्या अकाऊंटवर काय परिणाम होणार?

जर तुम्ही २ वर्षांपर्यंत स्टोर्ज लिमिट कमी केलं नाही किंवा इनॲक्टिव्हही करत नाही तर या नव्या पॉलिसीचा तुमच्या अकाउंटवर काहीही परिणाम होणार नाही. ही पॉलिसी १ जून २०२१ पासून लागू होणार आहे. म्हणजेच १ जून २०२३ नंतर तुमचा कंटेंट डिलीट होणार आहे.
१ जून २०२१ नंतर जर तुम्ही स्टोरेज लिमिटची मर्यादा ओलांडलीत किंवा इनॲटिव्ह असाल तर गुगल तुम्हाला ईमेल रिमाइंडर आणि नोटिफिकेशन पाठवेल आणि त्यानंतरच तुमचा कंटेंट डिलीट करेल. जरी तुमचा कंटेंट डिलीट झाला तरी, तुम्ही साइन इन करू शकता.

तुम्हाला तुमचं अकाऊंट ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी काय करावं लागणार?

आपल्याला आपली गुगल अकाऊंट स्टोरेज कोटा पॉलिसी समजून घ्यावी लागेल. तुम्ही तुमचं गुगल अकाऊंट स्टोरेज पाहूनच जीमेल, गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटोवर स्टोरेजमधून अनावश्यक कंटेंट डिलीट करून अतिरिक्त स्पेस फ्री करू शकता.
इनॲक्टिव्ह अकाऊंट मॅनेजर आपला कंटेंट मॅनेज करण्यात तुम्हाला मदत करेल. जर तुम्ही ३ ते १८ महिन्यांसाठी गुगल अकाऊंटचा वापरच केला नाही तर तुम्हाला तशी सूचना देण्यात येईल.