इंटरनेटही नको, ब्लू टूथही नको, तरीही राहा कनेक्टेड, येतंय गुगलचं हे नवं ऍप

या ऍपचं नाव आहे WifiNanScan. या ऍपच्या मदतीनं आसपासच्या स्मार्टफोनशी कनेक्ट होता येऊ शकतं. हे कनेक्शन होतं जवळपासच्या नेटवर्कच्या मदतीनं. यामुळे डेटा किंवा मेसेजेस एकमेकांना पाठवणं शक्य होतं. 

    वेगवेगळ्या संशोधनांसाठी आणि एकाहून एक सरस ऍप्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या गुगल कंपनीनं आता आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक अनोखं ऍप तयार केलंय. या ऍपच्या माध्यमातून इंटरनेट किंवा ब्लू टूथ शिवाय दोन हँडसेट एकमेकांशी कनेक्ट करणं शक्य होणार आहे.

    या ऍपचं नाव आहे WifiNanScan. या ऍपच्या मदतीनं आसपासच्या स्मार्टफोनशी कनेक्ट होता येऊ शकतं. हे कनेक्शन होतं जवळपासच्या नेटवर्कच्या मदतीनं. यामुळे डेटा किंवा मेसेजेस एकमेकांना पाठवणं शक्य होतं.

    या ऍपच्या मदतीनं युजर्स एखादं डॉक्युमेंट प्रिंटींगसाठी पाठवू शकतात आणि ही टेक्नॉलॉजी अत्यंत सुरक्षित मानली जाते. कुठल्याही नेटवर्कमध्ये लॉग-इन न करताही हे ट्रान्सफर करता येणं शक्य होतं.

    हे ऍप तुम्ही प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करू शकता. १ मीटरपासून १५ मीटर अंतरात हे ऍप वापरता येतं.