गुगल मीटच्या नव्या फिचरमुळे भाषांतराची अडचण होणार कमी, अधिक माहिती जाणून घ्या

‘गुगल मीट’वर लवकरच एकदम मस्त फिचर(New Feature On Google Meet) येणार आहे. गुगल मीटने लाइव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शनचं (Live Translated Captions) टेस्टिंग सुरू केलं आहे.

    कोरोनामुळे घोषित झालेल्या लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होमचा (Work From Home) ट्रेंड सुरु झाला. त्यामुळे अनेक कंपन्या, कर्मचारी मीटींगसुद्धा ऑनलाईन घेऊ लागले. ऑनलाईन मीटिंगची संख्या वाढल्याने यासाठी त्यासाठी ॲप्स वापरण्याकडे लोकांचा कल वाढला. या काळात ‘गुगल मीट’चा (Google Meet) सर्वाधित वापर केला गेला. आता ‘गुगल मीट’वर लवकरच एकदम मस्त फिचर(New Feature On Google Meet) येणार आहे. गुगल मीटने लाइव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शनचं (Live Translated Captions) टेस्टिंग सुरू केलं आहे. याचा उपयोग व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत होईल.

    गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गुगल मीट व्हिडिओ कॉल आता अधिक ग्लोबल आणि प्रभावी होण्यासाठी हे फीचर मदत करेल. हे फीचर युजर्सला आपल्या भाषेत कंटेंटचा वापर करण्यासाठी, माहिती शेअर करण्यासाठी, शिकण्यासाठी मदत करेल.

    एका रिपोर्टनुसार, गुगल मीटने लाइव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शनचं टेस्टिंग सुरू केलं आहे. हे गुगल मीटच्या स्डँडर्ट लाइव्ह कॅप्शनच्या एक पाऊल वर आहे. हे फीचर सुरुवातीला इंग्रजीतील मीटिंगला सपोर्ट करेल, ज्याच ट्रान्सलेशन स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, पोर्तुगालमध्ये केलं जाईल. यासाठी युजर्सला Settings मध्ये Captions वर स्विच करावं लागेल आणि खाली Translated Captions वर टॉगल करुन सेट करावं लागेल.

    हे फीचर केवळ गुगल वर्कस्पेस प्लस (Google Workspace plus), एन्टरप्राईज स्टॅन्डर्ड(Enterprise standard), एन्टरप्राईज प्लस (Enterprise plus), एज्युकेशन प्लस (Education plus), आणि टीचिंग अँड लर्निंग अपग्रेड (Teaching and learning upgrade) युजर्सद्वारे मीटिंग्ससाठी उपलब्ध आहे.