‘या’ युजर्सचे स्मार्टफोन आजपासून होतील Outdated, गुगल-जीमेल-युट्यूब काहीही चालणार नाही

आपणही जुना अँड्रॉईड फोन वापरत आहात? जर हो, तर तुमच्यासाठी अत्यंत दु:खद बातमी आहे. आजपासून तुमच्या फोनमधील Google Map, YouTube, Gmail सारख्या सेवा काम करणं बंद करतील. जाणून घ्या कारण...

    नवी दिल्ली : आपणही जुना अँड्रॉईड फोन वापरत आहात? जर हो, तर तुमच्यासाठी अत्यंत दु:खद बातमी आहे. आजपासून तुमच्या फोनमधील Google Map, YouTube, Gmail सारख्या सेवा काम करणं बंद करतील. गुगलने २३ (Google 23rd Birthday) वाढदिवसाचं निमित्त साधून या गोष्टींसाठी आजचाच मुहूर्त निवडला आहे. यामागील कारणाबद्दल बोलताना, गुगल मॅप्स, यूट्यूब आणि गुगल कॅलेंडर अँड्रॉईड आवृत्ती 2.3 आवृत्तीवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर वापरता येणार नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या सेवा वापरायच्या असतील, तर तुम्हाला Android 3 वर अपडेट व्हावे लागेल.

    Gmail, Youtube आणि Google कायमचे बंद होईल:

    गुगलचा असा विश्वास आहे की, अँड्रॉईड 2.3 आवृत्ती आता खूप जुनी आहे कारण आता अँड्रॉईड 12 लाँच होणार आहे. अशा परिस्थितीत, या जुन्या आवृत्तीवरील वापरकर्त्यांचा डेटा लीक होण्याचा धोकाही वाढला आहे. याच कारणामुळे कंपनीने या आवृत्तीवर जीमेल, युट्यूब आणि गुगल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सरळ अर्थ असा की, जर तुम्ही आतापर्यंत अँड्रॉईड 2.3 आवृत्ती वापरत असाल तर आजपासून तुम्हाला जीमेल, यूट्यूब आणि गुगल सेवा पुरवल्या जाणार नाहीत. जर तुमचा फोन अँड्रॉईड 3.0 किंवा त्यापेक्षा अपडेट व्हर्जनवर काम करत असेल तरच तुम्हाला या सेवांचा लाभ मिळेल.