वसंत ऋतूच्या स्वागतासाठी गुगलचे खास डूडल

वसंत ऋतू् हा सर्वांत चांगला ऋतू मानला जातो. उत्तर गोलार्धात झाडे, फुलांना नवीन पालवी फुटण्याचा हा हंगाम असतो. याच वसंत ऋतूतील भावना गुगलच्या या डूडलद्वारे प्रकट होत आहेत. फुले, मधमाशा आणि हेजहॉग यांनी हे डूडल साकारण्यात आले आहे.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, दिल्ली.

    गुगल नेहमीच खास डूडलद्वारे वेगवेगळे संदेश, सणांचे सेलिब्रेशन तसेच मोठ्या लोकांप्रती आदरभाव प्रकट करत असते. भन्नाट डूडलद्वारे एखाद्या गोष्टीला गुगल जगासमोर आणते. शनिवारीदेखील गुगलने एक खास डूडल बनविले आहे. 20 मार्चपासून उत्तर गोलार्धात वसंत ऋतू सुरू झाला आहे. वसंत ऋतू 21 जूनपर्यंत कायम असतो. हा काळ फुलांचा हंगाम म्हणूनही ओळखला जातो. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी गुगलने भन्नाट रंगीबेरंगी डूडल साकारले आहे.

    वसंत ऋतू् हा सर्वांत चांगला ऋतू मानला जातो. उत्तर गोलार्धात झाडे, फुलांना नवीन पालवी फुटण्याचा हा हंगाम असतो. याच वसंत ऋतूतील भावना गुगलच्या या डूडलद्वारे प्रकट होत आहेत. फुले, मधमाशा आणि हेजहॉग यांनी हे डूडल साकारण्यात आले आहे. डूडलमध्ये हेजहॉग सुंदर रंगीबेरंगी फुलांनी नटलेला दिसत आहे.