how to reduce the cost of home loans when interest rates are rising nrvb

तुमच्या गृहकर्जाचा कालावधी हा तुम्ही दर महिन्याला किती व्याज द्याल हे ठरवण्यासाठी महत्त्वाचा घटक ठरतो. तुमच्या कर्जाचा कालावधी कमी ठेवल्यास मासिक EMI वाढतो, ज्यामुळे तुमचे गृहकर्ज लवकर परतफेड करण्यास मदत होते व व्याजाची बचत देखील होते.

  गृहकर्जावरील (Home Loan) वाढत्या व्याजदरामुळे (Increase Interest Rate) गृहकर्ज घेणाऱ्या आणि संभाव्य गृहखरेदी धारकांना (Home Purchase Holders) पुर्नविचार करण्यास भाग पाडले आहे. नजीकच्या भविष्यकाळात तुमच बजेट (Budget) कशा रितीने मांडायचे याचा विचार तुम्ही करत असाल तर तुमच्या गृहकर्जावरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी काय क्लुप्त्या वापरता येतील यासाठी तुम्हाला खास पाच टिप्स सांगाव्याशा वाटतात ज्या तुम्हाला भविष्यात उपयुक्त ठरतील.

  कर्जाचा कालावधी कमी ठेवा

  तुमच्या गृहकर्जाचा कालावधी हा तुम्ही दर महिन्याला किती व्याज द्याल हे ठरवण्यासाठी महत्त्वाचा घटक ठरतो. तुमच्या कर्जाचा कालावधी कमी ठेवल्यास मासिक EMI वाढतो, ज्यामुळे तुमचे गृहकर्ज लवकर परतफेड करण्यास मदत होते व व्याजाची बचत देखील होते.

  जास्त डाउनपेमेंट करा

  बहुतेक गृहकर्ज वितरण करणाऱ्या वित्तसंस्था गृहकर्जाच्या ७५ -८० % कर्ज देतात आणि बाकीचे डाउनपेमेंट म्हणून भरण्यास सांगतात. बहुतेक लोक जास्तीत जास्त रक्कम कर्ज म्हणून घेण्याचा प्रयत्न करतात, त्याऐवजी तुम्ही डाउनपेमेंट जास्त करणे फायदेशीर ठरेल. गणित अगदी सोपे आहे : जेवढी लहान कर्जाची रक्कम = तेवढा कमी व्याजाचा परतावा.

  चांगल्या डीलवर लक्ष ठेवा

  जसे की जीवनात, महागडी खरेदी करायची असेल तर संयम ही गुरुकिल्ली आहे. तुम्ही जर वाट पाहत राहिल्यास, विशेषत: सणासुदीच्या काळात,अनेक कर्ज देणाऱ्या वित्तसंस्था प्रमोशनल स्कीम आणतात, जे तुम्हाला तुमच्या गृहकर्जाच्या परतफेडीवर लक्षणीय बचत करण्यास प्रवृत्त करतात.

  तुमचा EMI वाढवा

  काही कर्ज देणारे दरवर्षी तुम्हाला तुमच्या EMI मध्ये बदल करण्याची परवानगी देतात. त्यामुळे ,या वर्षी तुम्हाला बोनस किंवा चांगली पगारवाढ मिळाल्यास, तुमचा EMI थोड्या प्रमाणात वाढवा आणि कर्जाचा एकूण कालावधी कमी करा. यामुळे एकूण व्याज कमी होईल.

  प्रीपेमेंट करा

  कर्जदाराला गृहकर्जाच्या व्याजाचा प्रभाव कमी करण्यासाठी अंतिम उपाय म्हणजे – प्रीपेमेंट. विशेषतः इथे मी तुम्हाला अधिक विस्तृपणे समजावून सांगतो. तुमच्या मासिक ईएमआय मध्ये मुद्दल आणि व्याज असते. प्रीपेमेंट ही तुमच्या नियमित ईएमआयवर आणि त्याहून अधिक भरलेली रक्कम आहे जी थेट तुमच्या मुद्दलातून वजा केली जाते. कर्ज देणाऱ्याला तुमची देय रक्कम लवकर कमी होत असल्याने,तुम्ही तुमच्या कर्जावर कमी व्याज द्याल आणि लवकर कर्जमुक्त व्हाल. नियमित अंतराने छोटे प्रीपेमेंट्स भरण्याची सवय लावल्यास व्याजदर काही ही असोत तुमच्या गृहकर्जाची एकूण किंमत नक्कीच कमी होईल!

  येथे एक बोनस टीप आहे. काही कर्ज देणारे तुम्हाला अशी सुविधा देखील देतात जिथे तुमच्या खात्यातून तुमच्या गृहकर्जाच्या प्रीपेमेंटसाठी ठराविक रक्कम ऑटो -डेबिट केली जाते. ही सुविधा ऐच्छिक असल्याने, भविष्यात ती तुम्हाला अनुकूल नसेल तर तुम्ही ते बंद देखील करू शकता.

  त्यामुळे व्याज पेमेंटवर लाखोंची बचत करण्यासाठी तुम्ही माझ्या पाच टिप्स किंवा बोनस टीप वापरू शकता आणि तुमच्या स्वप्नातील घर कमी ताणतणाव आणि कमी खर्चात बनवू शकता. हॅपी होम बिल्डिंग !

  गौरव मोहता – प्रवक्ते, सीएमओ, होम फर्स्ट फायनान्स कंपनी