एचपीचा नवा Probook 635 Aero आला; लघु आणि मध्यम व्यवसायांसाठी सुरक्षित, कनेक्टेड आणि शक्तिशाली

एचपी प्रोबुक 635एरो पॉवर्ड बाय एएमडी रीझेन™ 4000 सीरिज देऊ करत आहे अत्यंत हलक्या वजनाच्या डिझाइनमध्ये पुरेशी मोबिलिटी, कामगिरी आणि उत्पादनक्षमता आहे.

एचपीने भारतातील छोट्या व्यवसायांच्या मालकांना मदत करणारे तसेच फिरतीवर असलेल्या व्यावसायिकांची उत्पादनक्षमता वाढवणारे, त्यांना सुलभेतने सहयोग करवून देणारे, कोठूनही काम करण्याची मुभा देणारे तसेच मजबूत सुरक्षा व कनेक्टिविटीचा आनंद देणारे प्रोबुक नोटबुक पॉवर्ड बाय एएमडी रिझेन फोर थाउजंड सीरिज प्रोसेसर आज बाजारात आणले आहे. ही एचपी प्रोबुक 635 एरो G7 नोटबुक्स एचपीची सर्वांत हलक्या वजनाची एएमडी आधारित बिझनेस नोटबुक्स आहेत. या नोटबुक्सपैकी सर्वांत कमी वजनाच्या नोटबुकचे वजन १ किलोग्रॅमहून (किंवा २.२ पाउंड) कमी आहे.

भारतातील छोटे आणि मध्यम व्यवसाय (एसएमबी) कोविडच्या प्रभावातून बाहेर येण्यासाठी डिजिटल रूपांतरणावर भरवसा ठेवून काम करत आहेत आणि कोविडच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्याबाबत अन्य आशियाई देशांतील व्यावसायिकांच्या तुलनेत त्यांचा आत्मविश्वास अधिक आहे, असे एचपी आशिया एसएमबी आउटलुक रिपोर्ट २०२०मधून समोर आले आहे. याशिवाय भारतातील एसएमबींना व्यवसायाच्या पुनरुज्जीवनासाठी डिजिटल होण्याचे महत्त्व पटलेले आहे.

डिजीटल स्वीकार यशासाठी अत्यावश्यक किंवा खूपच महत्त्वपूर्ण आहे, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी एक तृतीयांश (७५ टक्के) व्यावसायिकांना ठामपणे वाटते. एचपी प्रोबुक 635 एरो G7 हा एसएमबी, उद्योजक आणि चलनशील (मोबाइल) व्यावसायिकांच्या विशिष्ट गरजा डोळ्यापुढे ठेवून डिझाइन करण्यात आला आहे. या सर्व व्यावसायिकांचा भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा आहे.

“आपल्या जीडीपीमध्ये लघु व मध्यम व्यवसायांचा वाटा सुमारे एक तृतीयांश आहे आणि त्यातून लक्षावधी रोजगारांची निर्मिती होते. घरातून काम करणे ही कायमस्वरूपी परिस्थिती होत चालली असताना तसेच व्यवयासांना त्यांच्या मनुष्यबळाला दूरस्थपणे व कार्यालयातही सहाय्य पुरवावे लागत असल्याने, पीसी या हायब्रिड कार्यस्थळांसाठी अत्यावश्यक झाले आहेत. एचपी प्रोबुक 635 एरो G7 हे अत्यंत कमी वजनाच्या यंत्राद्वारे विनाप्रयास कनेक्टिविटी, एकात्मिक सुरक्षा व शक्तिशाली कामगिरी यांचा मेळ साधून बहुकार्यात्मक, बहुस्थळीय कामाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच तयार करण्यात आले आहेत,” असे एचपी इंडिया मार्केटचे वरिष्ठ संचालक (पर्सनल सिस्टम्स) विक्रम बेदी म्हणाले.

कोठूनही काम करण्याचे स्वातंत्र्य

अत्युच्च चलनशीलतेच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आलेला १३.३ इंचाचा प्रोबुक 635 एरो हा मॅग्नेशियम अलॉयमध्ये (मिश्रधातू) घडवण्यात आलेला पहिला प्रोबुक आहे आणि मॅग्नेशियमचा हलकेपणा व अॅल्युमिनिअमची मजबुती व आटोपशीर स्वरूप यांचा मेळ यात साधण्यात आला आहे. याचे खास एलिव्हेटेड डिझाइन, स्वत:च्या उपकरणांना व्यक्तिमत्वाचा विस्तारच समजणाऱ्या चलनशील व्यावसायिकांच्या नवीन पिढीची, भाषा बोलणारे आहे.

संपूर्ण धातूच्या बॉडीत चेसीस तसेच एरोडायनॅमिक कडा असलेले हे प्रोबुक 635 एरोचा दर्जा अव्वल आहे. ते आटोपशीरही आहे आणि मजबूतही आहे. त्याचे स्क्रीन-टू-बॉडी गुणोत्तर ८६.२ टक्के असल्याने वापरकर्त्यांना विस्तारित दृश्यात्मकतेचा (व्ह्यूएबिलिटी) लाभ घेता येईल. अत्यंत पातळ असे ९.५ मिमीचे वरील बेझेल आणि ४.२८ मिमीची बाजूची बेझेल्स यामुळे यात भर पडली आहे.

हायब्रिड कार्यस्थळांवरून काम करणाऱ्या तसेच समन्वय साधणाऱ्या मोबाइल व्यावसायिकांसाठी आदर्श असलेल्या प्रोबुक 635 एरोचा आवाज न करणारा कीबोर्ड, दीर्घकाळ चालणारी बॅटरी, कनेक्टिविटी आणि सुरक्षा सुविधा यामुळे व्यावसायिकांना दिवसभर पूर्ण क्षमतेने काम करता येते.

कनेक्टिविटी

वापरकर्ते आता वायरलेसच्या गर्दीतही विनाप्रयास वेगवान व खात्रीशीर गिगाबिट, कनेक्टिविटी सुरक्षिततेसह उपलब्ध करून घेऊन शकतात. यासाठी त्यांना वाय-फाय 6 आणि कॅट 9 4GLTE वायरलेस ब्रॉडबॅण्ड पर्याय वापरता येईल.

सुरक्षितता

सुरक्षा सुविधांचा सर्वसमावेशक ताफा, उपकरणाला ओएसवर, ओएसमध्ये आणि ओएसखाली, संरक्षण पुरवतो. एचपी शुअर व्ह्यू रिफ्लेक्टमुळे वापरकर्त्याला सावधपणे काम करण्याची मुभा मिळते. या प्रोबुकची कॉपर टिण्टेड रिफ्लेक्टिव प्रायव्हसी स्क्रीन म्हणजे या वर्गातील जगातील सर्वांत प्रगत प्रायव्हसी फीचर आहे. प्रकाशयुक्त तसेच अंधाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या वातावरणात ही प्रायव्हसी फीचर्स प्रतिस्पर्धी उत्पादनांच्या तुलनेत दुप्पट प्रभावी आहेत. एचपी प्रायव्हसी कॅमेरा हा मशिनच्या वरील बेझेलमध्ये आहे आणि तो अपघाताने होणारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टाळण्यासाठी फिजिकली बंद केला जाऊ शकतो. यामुळे वापरकर्त्यांना दुष्ट हेतूने केलेल्या हल्ल्यांपासून स्वत:चे रक्षण करता येते.

दीर्घकाळ चालणारी बॅटरी

कमी वजनाच्या ४२ Wh बॅटरीसोबत कन्फिग्युर केले असता बॅटरी १८ तासांपर्यंत चालते, तर ५३ Wh बॅटरी असेल, तर ती २३ तासांपर्यंत चालते . केवळ ३० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये उपकरणाची बॅटरी ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

किंमत आणि उपलब्धता

प्रोबुक 635 एरो हा आता www.HP.com या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे, त्याची प्रारंभिक किमत ७४,९९९ रुपये आहे.

नवीन वैशिष्ट्ये

नवीन एचपी प्रोबुक 635 एरो G7 दूरस्थ कामाच्या (रिमोट वर्किंग) काळातील व्यवसायांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले आहेत

प्रोबुक 635 एरो G7 बिझनेस लॅपटॉपच्या माध्यमातून एचपी हायब्रिड कार्यस्थळांच्या शोधात असलेल्या फिरत्या व्यावसायिकांना मुख्य धारेत काम करण्याचा अव्वल अनुभव देत आहे

पर्यायी पीआरओ तंत्रज्ञानांसह शक्तिशाली एएमडी रिझेन™ 4000 सीरिज मोबाइल प्रोसेसर्सने सुसज्ज असा हा लॅपटॉप आधुनिक व्यवसायांच्या कम्प्युटिंग गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम

बिझनेस ग्रेड सुरक्षेमुळे मन:शांतीची खात्री