If the emergency 'alarm button' is pressed, the police will inform BEST immediately; BEST's 'Chalo App' saves women travelers!

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न बेस्ट उपक्रमाकडून केला जात आहे. आता बेस्ट बसेसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी आधुनिक ‘चलो अ‍ॅप’ मध्ये आपत्कालीन "अलार्म बटण" उपलब्ध केले आहे. वेळ प्रसंगी हे बटण दाबल्यास पोलीस व बेस्ट उपक्रमाच्या नियंत्रण कक्षाला तातडीने माहिती मिळणार असून वेळीच महिला प्रवाशांची मदत करणे शक्य होणार आहे(If the emergency 'alarm button' is pressed, the police will inform BEST immediately; BEST's 'Chalo App' saves women travelers!).

    मुंबई : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न बेस्ट उपक्रमाकडून केला जात आहे. आता बेस्ट बसेसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी आधुनिक ‘चलो अ‍ॅप’ मध्ये आपत्कालीन “अलार्म बटण” उपलब्ध केले आहे. वेळ प्रसंगी हे बटण दाबल्यास पोलीस व बेस्ट उपक्रमाच्या नियंत्रण कक्षाला तातडीने माहिती मिळणार असून वेळीच महिला प्रवाशांची मदत करणे शक्य होणार आहे(If the emergency ‘alarm button’ is pressed, the police will inform BEST immediately; BEST’s ‘Chalo App’ saves women travelers!).

    बेस्टने प्रवाशांसाठी मोबाइलच्या सहाय्याने चलो ॲपमध्ये प्रवाशांना तिकीट, पास मिळण्याची सुविधा पुरविली आहे. त्यात, आता महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवीन सुविधा जोडण्यात आली आहे. बेस्टच्या प्रवाशांमध्ये महिला प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठीच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या ॲपमध्ये ‘अलार्म बटन’ अंतर्भूत करण्यात आले आहे.

    त्यात, महिला प्रवाशांनी आपत्कालीन स्थितीत अलार्म बटन दाबल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिस आणि बेस्ट नियंत्रण कक्षास मिळणार आहे.तसेच, ॲपमध्ये बसची नेमकी स्थिती कळत असल्याने पोलिसांसह बेस्टच्या कर्मचाऱ्यांना तिथे पोहोचणे शक्य होणार आहे. या अलार्म बटणची चाचणी सुरू असून जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत ही सुविधा कार्यान्वित होणार आहे. ॲपला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १ लाख २ हजार ३६० प्रवाशांनी हे अँप मोबाईल मध्ये डाऊनलोड केले आहे.