जोश मोबाइलने दिली देशभरातील महाशिवरात्री उत्सव ॲपवर पाहण्याची संधी

आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून जन्मलेल्या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या जोश ॲपने आरत्या, दर्शन, अन्य धार्मिक आयोजने आपल्या ॲपमार्फत सादर केली आहेत. भारतातल्या १३० शहरांमधील तब्बल ३०० मंदिरांमधून हा विविधांगी महाशिवरात्रीचा उत्सव कोट्यवधी भारतीयांपर्यंत जोशमार्फत पोहोचला आहे.

    बेंगळुरू : महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील शिवमंदिरांमध्ये झालेल्या पूजा-अर्चा आणि आरत्या घरबसल्या पाहण्याची संधी जोश या देशातल्या आघाडीच्या शॉर्ट व्हिडिओ ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी शिवभक्तांना मिळाली आहे. देशभरातल्या पुरातन आणि प्रसिद्ध अशा देवस्थानांमधील ५०० हूनही अधिक व्हिडिओज जोशने आपल्या ॲपवर सादर केले आहेत.

    हिवाळा सरत असतानाच देशभरात भगवान शंकराचा उत्सव असलेला महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येतो. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून जन्मलेल्या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या जोश ॲपने आरत्या, दर्शन, अन्य धार्मिक आयोजने आपल्या ॲपमार्फत सादर केली आहेत. भारतातल्या १३० शहरांमधील तब्बल ३०० मंदिरांमधून हा विविधांगी महाशिवरात्रीचा उत्सव कोट्यवधी भारतीयांपर्यंत जोशमार्फत पोहोचला आहे. कोईम्बतूरच्या इश योगा केंद्रापासून ते उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरापर्यंत अनेक नामांकित प्रार्थनास्थळांतील महाशिवरात्रीचा हा उत्सव शिवभक्तांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे.