मार्स रिगलीने लाँच केला भारतातील पहिला एमअँडएम एक्सपिरीयन्स एरिना

जगातील सर्वात मोठा चॉकलेट ब्रँड या नात्याने एमअँडएम (M&M) गेल्या ८० वर्षांपासून ग्राहकांना आनंद देत आहे. एक ब्रँड या नात्याने एमअँडएम (M&M) हे ग्राहकांच्या आनंदी- मजेदार आठवणींचा भाग असून लोकांना आपल्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाशी तसेच इतरांशी नाते जोडण्यासाठी ‘मजे’चा उपयोग करत एकमेकांमध्ये मिसळण्यासाठी मदत करणे हे एमअँडएमचे उद्दिष्ट आहे.

  • जागतिक स्तरावर लोकप्रिय आणि मजेदार ब्रँडचा नवा तसंच गुंतवून ठेवणारा अनुभव देणारा अशाप्रकारचा पहिलाच एक्सपिरियन्स एरिना

मुंबई : मार्स रिगलीने (mars wrigley) भारतात रिलायन्स रिटेलसोबतच्या भागिदारीत रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह (Jio World Drive) येथील फ्रेशपिक येथे भारतातील पहिला एमअँडएम एक्सपिरीयन्स एरिना (Experience Arena) लाँच केला आहे. नव्याने लाँच करण्यात आलेल्या एक्सपिरीयन्स एरिनामध्ये ग्राहकांना प्रसिद्ध एमअँडएम ब्रँडशी मजेदार व अविस्मरणीय पद्धतीने कनेक्ट होता येणार आहे. या एक्सपिरियन्स एरियनामध्ये भारतात पहिल्यांदाच ग्राहकांना एमअँडएम चे एक्सक्लुसिव्ह मर्चंडाइझ उपलब्ध होतील तसेच त्यांना जगभरात ब्रँडची ओळख असलेल्या संवादी वितरण युनिटमधून त्यांच्या आवडीच्या रंगाचे एमअँडएम मिळवता येतील.

जगातील सर्वात मोठा चॉकलेट ब्रँड या नात्याने एमअँडएम (m&m) गेल्या ८० वर्षांपासून ग्राहकांना आनंद देत आहे. एक ब्रँड या नात्याने एमअँडएम (m&m) हे ग्राहकांच्या आनंदी- मजेदार आठवणींचा भाग असून लोकांना आपल्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाशी तसेच इतरांशी नाते जोडण्यासाठी ‘मजे’चा उपयोग करत एकमेकांमध्ये मिसळण्यासाठी मदत करणे हे एमअँडएमचे उद्दिष्ट आहे. एक्सपिरियन्स एरिना याच उद्देशाने तयार करण्यात आला असून ते ग्राहकांना एक्सक्लुसिव्ह मर्चंडाइझच्या मदतीने तसेच एरिनाच्या अनोख्या डिझाइनमधून मुंबईला सलाम करत एमअँडएमचा असामान्य अनुभव देणारे आहे.

नव्या एक्सपिरियन्स एरिनाच्या लाँचविषयी मार्स रिगली, इंडियाचे कंट्री जनरल मॅनेजर कल्पेश आर. परमार म्हणाले, ‘एमअँडएम (m&m) हा आमचा जगभरातील सर्वात लोकप्रिय ब्रँड्सपैकी एक असून या ब्रँडच्या लोगोपासून, त्याच्या व्यक्तीरेखा, रंगीत कँडी शेलमधले चॉकलेटचे तुकडे जगभरात ओळखले जातात. २०१७ मध्ये भारतात एमअँडएम (m&m) लाँच झाल्यापासून आम्ही नाविन्यपूर्णता आणि ग्राहकांना आपलीशी वाटणारी कॅम्पेन्स व प्रमोशन्सच्या माध्यमातून ब्रँडचा विकास करत आहोत. आज, आम्हाला ब्रँडच्या भारतातील प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा – एमअँडएम (m&m) एक्सपिरियन्स एरिनाचा समावेश करताना अभिमान वाटत आहे. हा पहिलावहिला एक्सपिरियन्स एरिना रिलायन्स रिटेलबरोबर भागिदारीमध्ये रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे सुरू करण्यात आला आहे.’

‘मार्स रिगलीमध्ये आम्ही कायमच ग्राहकांशी संवाद साधण्याचे, त्यांच्यासाठी हजारो सुंदर क्षणांची निर्मिती करण्याचे नवनवीन आणि कल्पक मार्ग शोधत असतो. हा एक्सपिरियन्स एरिना आमच्या प्रयत्नांचे उत्तम उदाहरण असून यापुढेही आम्ही ग्राहकांना आवडणारी उत्पादने, कॅम्पेन्स व अनुभव तयार करत राहू,’ असेही ते म्हणाले.

‘मार्स रिगलीबरोबर भागिदारी जाहीर करताना आणि हा अनोखा, मजेदार एमअँडएम एक्सपिरियन्स एरिना लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. जर चांगले खाद्यपदार्थ तुम्हाला भुरळ घालत असतील, तर फ्रेशपिक हे तुमच्यासाठी नंदनवन आहे. ते तुमच्या सर्व अनुभूतींसाठी – स्पर्श, दृष्टी, वास, चव, आनंद आनंददायी आहे. तुमच्या आवडीच्या पदार्थांची यादी बनवून आणा आणि मला खात्री आहे, की आम्ही तुम्हाला आश्चर्यचकित करू. फ्रेशपिक हे केवळ एक दालन नाही, तर खाद्य अनुभूती देणारे ठिकाण आहे,’ असे रिलायन्सच्या ग्रोसरी रिटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर माल म्हणाले.

जिओ वर्ल्ड, बीकेसी मधील फ्रेशपिक येथील एमअँडएमचा एक्सपिरियन्स एरिना सर्व दिवशी सकाळी ११ ते रात्री ९.३० पर्यंत खुला राहील. दालनाचे सर्व सदस्य आणि डिलीव्हरी भागीदार ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोविड- सुरक्षा नियमांचे कडक पालन करतील.