एमस्वाईपचे अँड्रॉइडवर आधारित POS डिव्हाईस, वाईजपीओएस गो {फोन + पीओएस मशीन} Karnataka Bankच्या लघु व मध्यम व्यावसायिक ग्राहकांना अखंडित डिजिटल स्वीकार आणि पेमेंट सुविधांचे लाभ देणार

भारतातील अशा प्रकारची पहिलीच पीओएस मशीन असलेले ‘वाईजपीओएस गो’ हे अगदी सहज हाताळता येईल अशा आकाराचे, वजनाला हलके आणि वापरायला अतिशय सोपे डिव्हाईस असून त्यामुळे लघु व्यावसायिकांना आपल्या गतिशीलतेमध्ये सुधारणा करता येईल, पेमेंट्सना बिझनेस ॲप्लिकेशन्ससोबत एका साधनावर एकीकृत करता येईल.

    मुंबई : लघु उद्योजकांना (small businessmen) त्यांच्या व्यवसायामध्ये भेडसावणाऱ्या पेमेंट्सशी संबंधित वेगवेगळ्या अडचणी दूर करण्यासाठी एमस्वाईप (mswipe) कर्नाटक बँकेच्या (Karnataka Bank) सर्व लघु व मध्यम व्यावसायिक ग्राहकांसाठी सादर करत आहे नवे अँड्रॉइडवर (New Android base) आधारित पीओएस डिव्हाईस (POS Device), ‘वाईजपीओएस गो’ (YJPOS Go). हे साधन लघु व मध्यम व्यावसायिकांना त्यांच्या त्यांचे व्यवसाय व्यवस्थापन सुरळीतपणे पार पाडण्यात मदत करेल.

    भारतातील अशा प्रकारची पहिलीच पीओएस मशीन असलेले ‘वाईजपीओएस गो’ हे अगदी सहज हाताळता येईल अशा आकाराचे, वजनाला हलके आणि वापरायला अतिशय सोपे डिव्हाईस असून त्यामुळे लघु व्यावसायिकांना आपल्या गतिशीलतेमध्ये सुधारणा करता येईल, पेमेंट्सना बिझनेस ॲप्लिकेशन्ससोबत एका साधनावर एकीकृत करता येईल.

    सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपयुक्त ठरतील अशा डिजिटल सेवासुविधा प्रदान करून त्यांना सक्षम करणारी आघाडीची कंपनी एमस्वाईपने वाईजपीओएस गो अशावेळी सादर केले आहे जेव्हा बहुतांश व्यावसायिकांना पेमेंट्स स्वीकारण्यासाठी वेगवेगळी साधने वापरावी लागत आहेत. कमी खर्चाचे, वापरायला सोपे, आधुनिक एनएफसी आणि क्यूआर कोडसह हे साधन सर्व प्लॅटफॉर्म्सवर चालते आणि यामध्ये कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे लघु व्यावसायिकांसाठी हे खूपच योग्य आहे. कर्नाटक बँकेच्या ग्राहकांना त्याच पीओएस डिव्हाईसवर एमस्वाईपच्या मनीस्टोरमधून (एमस्वाईपच्या स्मार्ट पीओएस टर्मिनल्सवर प्रीलोड केलेले विशेष ॲप) ॲप्स एकीकृत करता येईल आणि वेगवेगळ्या पेमेंट सुविधा ॲप्स व मूल्यवर्धित सेवांचे लाभ त्या एकाच डिव्हाईसवर मिळतील.

    एमस्वाईपचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर केतन पटेल यांनी सांगितले, “कर्नाटक बँकेच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक ग्राहकांसाठी हे उत्पादन विकसित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, याचा उपयोग करून त्यांच्या पेमेंट प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पडतील. ‘वाईजपीओएस गो’ सादर करून देशात डिजिटल पेमेंटच्या पायाभूत सोयीसुविधांचा विस्तार करण्याच्या आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने आम्ही अजून एक पाऊल पुढे उचलले आहे.”

    कर्नाटक बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. महाबळेश्वर एम एस यांनी सांगितले, “भविष्यासाठी डिजिटल बँक बनण्याच्या आमच्या उद्धिष्टाला अनुसरून आम्ही हे अजून एक उत्पादन सादर करत आहोत. एमस्वाईपचे हे सहज हाताळता येण्याजोगे, वजनाला हलके आणि वापरायला अगदी सोपे डिव्हाईस क्रांतिकारी ठरेल आणि पीओएसशी संबंधित डिजिटल पेमेंट व्यवस्थेमध्ये नवे परिवर्तन घडवून आणेल. एकाच डिव्हाईसवर बिझनेस ॲप्लिकेशन्ससोबत पेमेंट्स एकीकृत करून लघु व्यावसायिकांना काम मिळवण्यासाठी, उद्योग वाढवण्यासाठी एक गतिशील व उपयुक्त प्लॅटफॉर्म मिळेल आणि तो लाभदायक ठरेल. वाईजपीओएस गो मार्फत व्यवहार करणे अगदी सहजसोपे असल्याने बँकेच्या रिटेल आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक ग्राहकांना आपल्या ग्राहकांना खरेदीचा सुविधाजनक आणि लवचिक मार्ग उपलब्ध करवून देऊन स्वतःच्या व्यवसायात वाढ करता येईल.”