नावटेकतर्फे भारतातील अत्युच्च ठिकाणी लाय-फाय नेटवर्क; उपलब्ध विजेवर जलद आणि सुरक्षित मिळणार इंटरनेट

या लाय-फायमुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक हेतूंसाठी (Educational purpose) उपलब्ध विजेवर जलद आणि सुरक्षित इंटरनेट मिळणार आहे (Fast and secure internet will be available on available electricity). नाव वायरलेस टेक्नॉलॉजीज ( nav wireless technology) ही आशियातील लाय-फाय क्षेत्रातील एकमेव नोंदणीकृत कंपनी आहे.

    मुंबई : स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख Students Educational and Cultural Movement of Ladakh) ही संस्था लाइट फिडेलिटी (Light fidelity) या (लाय-फाय) तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेट कनेक्शन असलेली पहिली संस्था बनली आहे. एनएव्ही वायरलेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडने (नावटेक) स्थानिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी भारताच्या सर्वोच्च उंचीच्या ठिकाणी असलेल्या लडाख येथील शैक्षणिक संस्थेत लाय-फाय (LiFi) नेटवर्कची स्थापना केली आहे.

    या लाय-फायमुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक हेतूंसाठी (Educational purpose) उपलब्ध विजेवर जलद आणि सुरक्षित इंटरनेट मिळणार आहे (Fast and secure internet will be available on available electricity). नाव वायरलेस टेक्नॉलॉजीज ( nav wireless technology) ही आशियातील लाय-फाय क्षेत्रातील एकमेव नोंदणीकृत कंपनी आहे.

    याबाबत बोलताना संबंधित संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष सोनम वांगचुक म्हणाल्या की, “आमच्या कॅम्पसमध्ये नाविन्यपूर्ण लाय-फाय तंत्रज्ञानाचा वापर करून कायमस्वरूपी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची स्थापना पाहून आनंद झाला. ऑनलाइन व्याख्याने आयोजित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी संस्थेला फायदा होईल. हे तंत्रज्ञान पर्यावरणास अनुकूल आहे असे त्यांनी सांगितले.

    तसेच प्रकल्पामागील हेतू स्पष्ट करताना नावटेक चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी हार्दिक सोनी म्हणाले की, “भारताच्या सर्वोच्च ठिकाणी असलेल्या शैक्षणिक संस्थेत लाय-फाय तंत्रज्ञान स्थापित केल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही या प्रकल्पासाठी संस्थेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता आणि ते अत्यंत उच्च दर्जाचे होते. जलद, सुरक्षित आणि स्वस्त इंटरनेट प्रदान करण्याच्या अशा अभिनव कल्पनेने प्रभावित झालो. सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही संपूर्ण लडाख कव्हर करण्यासाठी एकत्र येऊ आणि या लाय-फाय नेटवर्कची संपूर्ण परिसरात जोडणी करू असा मानस त्यांनी व्यक्त केला.