भारतीय बाजारात चायनीज स्मार्टफोनचा धुमाकूळ, ‘इतक्या’ युनिट्सची केली रेकॉर्डब्रेक विक्री

 २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता या फोनचा फ्लिपकार्टवर सेल आयोजित करण्यात आला आहे. ज्यांना हा स्मार्टफोन हव्या त्या स्टोरेज प्रकारामध्ये अथवा कलर व्हेरिएंटमध्ये हवा आहे, ते ग्राहक २९ मार्चला दुपारी १२ वाजता हा स्मार्टफोन खरेदी करु शकतात. किफायतशीर किंमत कंपनीने POCO M3 स्मार्टफोनचे दोन वेरिएंट्स सादर केले आहेत.

    गेल्या महिन्यात POCO India कंपनीने भारतात एक नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनचं नाव POCO M3 असं असून हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. विक्रीसाठी उपलब्ध होताच काही वेळातच हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. त्यानंतर अनेकदा हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला तेव्हा बऱ्याचदा हा स्मार्टफोन आऊट ऑफ स्टॉक झाला. सध्यादेखील याचे अनेक व्हेरिएंट्स आऊट ऑफ स्टॉक आहेत.

    २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता या फोनचा फ्लिपकार्टवर सेल आयोजित करण्यात आला आहे. ज्यांना हा स्मार्टफोन हव्या त्या स्टोरेज प्रकारामध्ये अथवा कलर व्हेरिएंटमध्ये हवा आहे, ते ग्राहक २९ मार्चला दुपारी १२ वाजता हा स्मार्टफोन खरेदी करु शकतात. किफायतशीर किंमत कंपनीने POCO M3 स्मार्टफोनचे दोन वेरिएंट्स सादर केले आहेत.

    ज्यामध्ये 6GB RAM आणि 64GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत १०,९९९ रुपये इतकी आहे, तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662G प्रोसेसरवर चालतो.