ओमरॉन हेल्थकेअरच्या वतीने अभिनव वैशिष्ट्यांसह टेलिहेल्थ प्रस्तावाला नवीन साज; ॲपचा वापर करणाऱ्या ग्राहकांकरिता हेल्थ गिफ्ट आणि बीपी डायरी सादर

हे ॲप देशभरातील लाखो लोक वापरत असून ते ओमरॉन डिजिटल बीपी मॉनिटर आणि बॉडी कंपोझिशनचा उपयोग करतात. या वृद्धीत अभिनव स्वरूपाच्या हेल्थ गिफ्ट प्रोग्रामचा समावेश आहे. ऑनलाइन आणि सॉफिस्टीकेट बीपी डायरीत नोंद ठेवणाऱ्याला उपयुक्त भेटवस्तू देण्यात येणार आहेत. ज्यामुळे घरात आरामात आणि स्पष्टपणे बीपीवर देखरेख ठेवणे शक्य होईल.

  मुंबई : ओमरॉन हेल्थकेअर इंडिया (OMRON Healthcare India), हे डिजिटल होम ब्लड प्रेशर मॉनिटरींग (Digital home blood pressure monitoring) प्रकारातील अग्रगण्य नाव मानले जाते. टेलीहेल्थ आणि रिमोट पेशंट मॉनिटरींग (Telehealth and remote patient monitoring) प्रकारात त्यांच्या मोबाईल ॲपच्या (Mobile App) साथीने अभिनव अद्ययावतीकरणावर आधारित प्रगत डिजिटल अनुभवाची तरतूद करत आपले अस्तित्व बळकट करण्यासाठी सर्वार्थाने सज्ज आहे.

  कंपनीने त्यांचे सध्याचे ॲप ओमरॉन कनेक्ट (“OMRON Connect”) मध्ये नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांचा सूट सादर केला आहे. हे ॲप देशभरातील लाखो लोक वापरत असून ते ओमरॉन डिजिटल बीपी मॉनिटर आणि बॉडी कंपोझिशनचा उपयोग करतात. या वृद्धीत अभिनव स्वरूपाच्या हेल्थ गिफ्ट प्रोग्रामचा समावेश आहे. ऑनलाइन आणि सॉफिस्टीकेट बीपी डायरीत नोंद ठेवणाऱ्याला उपयुक्त भेटवस्तू देण्यात येणार आहेत. ज्यामुळे घरात आरामात आणि स्पष्टपणे बीपीवर देखरेख ठेवणे शक्य होईल. त्यामुळे ॲप्लिकेशन तसेच क्षमतांच्या डेटा व्यवस्थापन क्षमतादेखील अद्ययावत झाल्या आहेत. ज्यामुळे या इंटरफेसवर अन्य कंपन्यांच्या हेल्थकेअर ॲप्लिकेशन वापरणे शक्य होईल.

  हेल्थ गिफ्टचे उद्दिष्ट देखरेखीला अधिक गुंतवून ठेवणारे आणि मौल्यवान करण्याचे आहे. ओमरॉन ब्लड प्रेशर मॉनिटर आणि बॉडी कम्पोजिशन मॉनिटर नियमितपणे आरोग्य स्थितीवर देखरेख ठेवण्यास उपयुक्त आहे. सोबतच हेल्थ कॉइन्स आणि वाऊचर (प्रत्येक मोजमापासह)सारखे रिवॉर्ड दिले जातील. बीपी डायरीचा उपयोग उपभोक्त्याच्या लाइफस्टाइल अनुसार त्याच्या रक्तदाबाची (बीपी) नोंद ठेवण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे ट्रेंड्सवर नजर ठेवण्यास मदत होईल. ज्याचा उपयोग अधिक वैयक्तिक आणि प्रभावी बीपी व्यवस्थापनाकरिता होणार आहे.

  ज्या रुग्णांना संसर्गजन्य आजार जसे की उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) आणि मधुमेह (डायबेटीज) आहेत, ते ठरावीक कालावधीत मोजमाप आणि योग्य उपचाराकरिता घरगुती हेल्थकेअर डेटावर अवलंबून राहू शकतात. तरीच, ज्या व्यक्ति तंत्रज्ञान-स्नेही नाहीत त्यांच्यासाठी हे आव्हानात्मक बनले होते. उपकरणे संपर्क साधण्याजोगी नव्हती, अगोदरची माहिती सहज उपलब्ध नसायची आणि योग्य वेळेत रुग्ण आणि फिजिशियन दरम्यान माहिती उपलब्ध होण्यात अडथळे असल्याने गुंतागुंत असायची. मात्र ओमरॉन कनेक्टसारख्या प्रगत बीपी ॲप्लिकेशनच्या साह्याने अगदी नॉनकनेक्टेड ओमरॉन बीपी मॉनिटर उपकरणांद्वारे माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. यामधील ओसीआर प्रणालीमुळे ते शक्य असून ओमरॉन उपकरण हे उपभोक्त्यासाठी उपयुक्त ठरते आणि त्यामुळे ते अतिशय मोलाचे सिद्ध होते. हे उपकरण कामाचे असल्याने अधिकाधिक उपभोक्ते मंचावर सामील होत आहेत.

  या लॉन्चविषयी बोलताना ओमरॉन हेल्थकेअर इंडियाचे एमडी मसानोरी मात्सुबारा म्हणाले की, “सुमारे 350 दशलक्ष हायपरटेन्सीव्ह रुग्ण आणि 135 दशलक्ष लोक वजन व्यवस्थापनासाठी संघर्ष करत असतात. अनेकजण नियमित देखरेख ठेवण्यात कंटाळा करतात आणि ॲप्लिकेशन वापरतात. त्यांच्यासाठी संपूर्ण अनुभव बोजड ठरतो. सध्याच्या स्थितीत, जागतिक स्तरावर आरोग्य धोक्यात असताना ओमरॉनचा टेलीहेल्थवर विश्वास आहे. लोकांच्या फायद्याकरिता माहितीचे जतन करण्याच्या शक्यता त्यामुळे वाढतात. लोक अधिक नियमितपणे आणि सक्षम पद्धतीने घरीच आरोग्याची देखरेख ठेवू शकतात. ओमरॉनने या क्षेत्रात मोठी झेप घेतली असून आमच्या मालकीच्या डिजीटल मालमत्तेत महत्त्वपूर्ण सुधारणा सादर केल्या आहेत. रिमोट हेल्थकेअर सेवा पुरवठादारांसमवेत भागीदारीच्या माध्यमातून ते या परिसंस्थेचा भाग झाले आहेत.”

  महामारीच्या काळात वैद्यकीय चिकित्सकांपासून दूर अंतरावरून टेलीकन्सलटेशनच्या माध्यमातून सल्ला घेण्याच्या प्रमाणात साधारणपणे 500%ची वाढ झालेली दिसते (मार्च आणि मे 2020 दरम्यान) टेलीहेल्थ परिघात आरोग्य उपभोक्त्यांच्या पद्धतीत मोठा बदल झाल्याचे अहवालांवरून समजते. मोबाईल हेल्थ ॲपच्या वापरावर करण्यात आलेल्या 2019 study अभ्यासानुसार वापरकर्ता अनुभव घटकांचे महत्त्व अधोरेखित होते. जसे की, माहिती जमविण्याची क्षमता आणि ॲप इंटरफेस नियमितपणे वापरून माहिती अद्ययावत ठेवण्याकडे कल वाढतो आहे. हा बदल ग्राहकांच्या फायद्याची सुधारित टेलीहेल्थ ॲप वैशिष्ट्यांच्या गरजेकडे अंगुलीनिर्देश करतो.

  महासाथ अजूनही आटोक्यात आल्याची चिन्हे दिसत नसल्याने लोकांच्या आरोग्याची खातरजमा ठेवणारी घरगुती आरोग्य देखरेख व्यवस्थापन (होम हेल्थकेअर मॅनेजमेंट) अत्यावश्यक ठरणार आहे. ओमरॉनच्या साथीने आरोग्याची नोंद ठेवण्याचे वैशिष्ट्य लोकांना त्यांचे आरोग्य ध्येय तसेच सुलभ आणि अचूक परिणामांसह सर्वसमावेशक अनुभव देणार आहे. ज्यामुळे संघटनेचे ‘शून्य’ कार्डीओवेस्क्यूलर प्रसंग गाठण्याच्या ध्येयाजवळ पोहोचण्यात चालना मिळेल.