uddhav thackeray and yogi

कुठे महाराष्ट्राची शान अन्कुठे उप्रची गरिबी" असे लिहिलेले पोस्टरही त्यांनी झळकविले. दरम्यान जर योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी बॉलिवूडला उत्तरप्रदेशात नेऊन दाखवावे, असे आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्यनाथांना दिले.

उत्तरप्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मुंबईत येऊन झाली आहे. दादासाहेब फाळके यांचा वारसा लाभलेला १०० वर्षे जुना मुंबईतील चित्रपट उद्योग स्वत:ला इतका असुरक्षित का सकाही चित्रपट अभिनेते आणि निर्मात्यांची भेट घेतली. यामुळे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण मजत आहे? उप्रचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यमुनेच्या तीरावर नोएडा येथे १ हजार एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘फिल्मसिटी (Noida Film City) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कलकत्ता, चेन्नई, हैदराबाद येथेही चित्रपटाची निर्मिती होत असते, त्यामुळे बॉलिवूड (Bollywood) कधीही चिंतित नव्हते, परंतु उत्तरप्रदेशात फिल्मसिटी काण्याची घोषणा करताच महाराष्ट्रातील नेते मात्र चिंताग्रस्त झालेले आहेत.

कुठे महाराष्ट्राची शान अन्कुठे उप्रची गरिबी” असे लिहिलेले पोस्टरही त्यांनी झळकविले. दरम्यान जर योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी बॉलिवूडला उत्तरप्रदेशात नेऊन दाखवावे, असे आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्यनाथांना दिले. या वादामध्ये मनसेनेही उडी घेतली असून मनसेचे घाटकोपर शाखेचे अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगीचे नाव न घेता त्यांना ‘ उत्तरप्रदेशचा ठग’ असे ल्या मुंबई दौ-याबाबत खुलासा करताना योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, मी बॉलिवूड घेऊन जाण्यासाठी आलो नाही. आमची नियत स्वच्छ आहे. उत्तरप्रदेशात एक विश्‍वसनीय फिल्मसिटी स्थापन करण्याचा आमचा विचार आहे. त्यानुषंगाने मुंबईतील उद्योगपती आणि चित्रपट कलावंतांशी चर्चा करण्यासाठी मी मुंबईत आलो. योगी यांनी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अक्षयकुमार यांची भेट घेतली .

बॉलिवूडवरील आरोप

बॉलिवूडवर नेहमीच आरोप होत असते की, मुंबईतील हा उद्योग अंडरवर्ल्ड माफियाच्या दबावाखाली चालत असतो. अंडरवल्डचे डॉन चित्रपट उद्योगात प्रचंड पैसा गुंतवितात व आपल्या मर्जीप्रमाणे चित्रपटाची निर्मिती करीत असतात. अनेक चित्रपटाच्या प्रसारणाचे अधिकारही या डॉनकडे असते. या अंडरवर्ल्डच्या डॉनला आव्हान देण्यासाठी जेव्हा शिवसेना मैदानात उतरली तेव्हा हे सारे डॉन शिवसेनेपुढे नतमस्तक झाले. नवीन चित्रपट रिलिज करण्यापूर्वी कित्येक निर्माते आणि दिग्दर्शक शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत होते.

बदल तर होतच असतो

बदल हा निसर्गाचा नियमच आहे. यापूर्वीही चित्रपट उद्योगात वेळोवेळी बदल झालेले आहेत. फाळणीपूर्वी चित्रपट उद्योग लाहोर येथे होता. फाळणीनंतर तो मुंबईत आला. पुणे आणि कोल्हापूरच्या चित्रपट निर्मात्यांनीही मुंबईचीच कास धरली. दक्षिण भारतात तयार होणारे चित्रपट जेमिनी आणि एव्हीएमच्या बॅनरखाली निर्माण होतात. एल.व्ही. प्रसाद प्रॉडक्शनसुद्धा हिंदी चित्रपट निर्माण करीत होते. परंतु नंतर मात्र त्यांनी हिंदी चित्रपट बनविणे थांबविले. दक्षिण भारतातील नायिका बैजयंतीमाला, पद्रिनी, रेखा, हेमामालिनी, श्रीदेवी यांनीही बॉलिवूडच्या चित्रपटात भूमिका केलेल्या आहेत. आता योगी आदित्यनाथ यांच्या फिल्मसिटीमध्ये पुढे चालून बॉलिवूडचे किती निर्माते-दिग्दर्शक जातात तेच आता बघायचे आहे. उत्तरपरदेशातही चित्रपट निर्माण व्हावे असे मला वाटते असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे . पंजाब आणि दिल्लीतील अभिनेते आणि अभिनेत्री प्रमाणेच उत्तरप्रदेशातील कितीतरी कलावंत मुंबईत येऊन बॉलिवूडमध्ये काम करतात. उत्तरप्रदेशातील कितीतरी संगीतकार आणि गीतकार मुंबईच्या चित्रपट नगरीत आहेत. योगींना या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे . शेवटी प्रत्येकालाच आपले राज्य प्रिय असते!

हिंदी राज्याची पार्श्वभूमी

बॉलिवूडचे असे कितीतरी चित्रपट आहेत की, त्यांना हिंदी भाषिक राज्यांची पार्श्वभूमी आहे. त्या चित्रपटांचे कथानक आणि भाषा हिंदी भाषिक राज्यांशीच संलग्न आहे. कलाकार जर विदेशात जाऊन शूटिंग करू शकतात तर नोएडा येथील फिल्म सिटीमध्येही ते शूटिंग करू शकतील. भोजपुरी चित्रपटाची निर्मिती जर बिहारमध्ये होऊ शकते तर हिंदी चित्रपटांची निर्मिती उत्तरप्रदेश का होऊ शकणार नाही ? नोएडा येथे १ हजार एकर जागेवर नवीन चित्रपट नगरीची निर्मिती होणार असेल तर तेथे सर्वप्रकारच्या सोयी-सुविधा असणारच. तरीही एक गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी की, हैदराबाद येथी रामोजी फिल्म सिटीमध्ये सर्व प्रकारच्या शूटिंगची व्यवस्था असतानाही तेथे मात्र चित्रपटांची शूटिंग फारच कमी प्रमाणात होत असते. रामोजी फिल्म सिटीमध्ये पर्यटकांचीच गर्दी असते. यामागील कारण असे की, बहुतेक चित्रपट निर्माते चित्रपटाच्या शूटिंगसाठी कलावंतांना लंडन, पॅरिस, स्वीत्झरलंडलाच घेऊन जातात. त्यामुळेच हैदराबादची रामोजी फिल्मसिटी मुझियम बनले आहे. योगी आदित्यनाथ यांना नोएडा चित्रपट नगरी उभारल्यानंतर या सर्व बाबींचा विचार करावा लागणार आहे.