धनंजय मुंडे व्यतिरिक्त ‘या’ राजकीय नेत्यांचेही होते विवाहबाह्य संबंध!

विवाह बाह्य संबंधामध्ये नाव गोवल्या गेलेले धनंजय मुंडे हे काही एकमेव राजकीय नेते नाहीत. या आधी आणखीही काही नेत्यांची नावे विवाह बाह्य किंवा प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आली होती. 

मुंबई. एका महिलेने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप (Rape) केला आणि राजकीय क्षेत्रापासून तर सर्वसामान्यांपर्यंत सर्वांच्याच भुवया उंचावल्या. स्वतः धनंजय मुंडे यांनी या संबंधाची कबुली दिल्याने आणखीच चर्चा रंगू लागली आहे, परंतू विवाह बाह्य संबंधामध्ये नाव गोवल्या गेलेले धनंजय मुंडे हे काही एकमेव राजकीय नेते नाहीत. या आधी आणखीही काही नेत्यांची नावे विवाह बाह्य किंवा प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आली होती.

अमर सिंह

समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते अमर सिंह यांचे नावसुद्धा चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल बिपाशा बासू हिच्याशी जोडले गेले होते. अमर सिंह आणि बिपाशा यांच्यातले संभाषण असलेली ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या अश्लील संभाषणामुळे अमर सिंह यांना मोठ्या प्रमाणात बदनामी सहन करावी लागली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका ढकल केली होती. २००६ मधल्या या प्रकरणाची ऑडिओ क्लिप आजही यु ट्यूबवर उपलब्ध आहे.

ओमर अब्दुल्ला

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चाही मोठ्या प्रमाणात रंगली होती. पत्रकार निधी राझदान यांच्याशी त्यांचे नाव जोडले गेले होते. दरम्यान त्यांच्या घटस्फोटालाही निधीच जबाबदार असल्याची चर्चा होती. जम्मू काश्मीर दौऱ्यावर असताना निधीची ओळख ओमर यांच्याशी झाली होती.

दिग्विजय सिंह

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हेसुद्धा  प्रेम प्रकरणाच्या बाबतीत मागे नाही. न्यूज अँकर अमृता राय यांच्याशी असलेल्या प्रेमसंबंधाची त्यांनी जाहीर कबुली दिली होती. ‘प्यार किया तो डरना क्या?’ असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी अमृताशी लग्नही केले.