सचिन वाझेच्या अटकेनंतर प्रथमच परमबीर सिंहांची समोरासमोर भेट, काही सेकंदांसाठी संवाद

उद्योजक मुकेश अंबानींच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटके आढळल्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या, त्यात मनसुख हिरेन या व्यापा-याची हत्या झाल्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझेंच्या अटकेनंतर पहिल्यांदाच परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले. त्यामुळे काही सेकंदांच्या भेटीत या दोघांमध्ये काय बोलणे झाले असावे याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात असून जोरदार चर्चा रंगल्या आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह यांना आता राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी सीआयडी परमबीर सिंह यांची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सीआयडीकडून दोन गुन्ह्यात परमबीर सिंग यांना समन्स बजावले असल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे.

    मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी चांदीवाल आयोगासमोर हजेरी लावली. त्याचवेळी बडतर्फ सहायक पोलीस निरिक्षक सचीन वाझे देखील आयोगासमोर हजर होण्यासाठी आला असता दोघां माजी सहका-यांमध्ये काही सेकंद संवाद झाल्याची माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे, मात्र यावेळी दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला ते समजू शकले नाही. दरम्यान परमबीरसिंह यांचे चांदीवाल आयोगासमोर गैरहजर राहिल्याने दोनदा बजावलेले जामीनपात्र वॉरंट रद्द झाले असून त्यांना तातडीने जामीनाची रक्कम भरण्याचे  निर्देश आयोगाने दिले आहेत.

    वाझेंच्या अटकेनंतर पहिल्यांदाच एकमेकांसमोर भेट

    उद्योजक मुकेश अंबानींच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटके आढळल्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या, त्यात मनसुख हिरेन या व्यापा-याची हत्या झाल्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझेंच्या अटकेनंतर पहिल्यांदाच परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले. त्यामुळे काही सेकंदांच्या भेटीत या दोघांमध्ये काय बोलणे झाले असावे याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात असून जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

    सीआयडीकडून दोन गुन्ह्यात समन्स

    मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह यांना आता राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी सीआयडी परमबीर सिंह यांची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सीआयडीकडून दोन गुन्ह्यात परमबीर सिंग यांना समन्स बजावले असल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे. सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवशी चौकशीला हजर राहण्याचे समन्स त्यांना पाठवले आहे. मरीन ड्राईव्हमधील श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना समन्स देऊन चौकशीला सोमवारी बोलावण्यात आले आहे. ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांना मंगळवारी हजर राहण्यासाठी समन्स देण्यात आल्याची माहिती आहे. ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातून सीआयडीला वर्ग झालेल्या भीमराव घाडगे यांच्या तक्रारीचा अट्रोसिटीच्या गुन्ह्यात परमबीर यांचा जून महिन्यात जबाब सीआयडीने नोंदवला आहे. अट्रोसिटी गुन्ह्यात चंदीगढला जाऊन परमबीर यांचा जबाब सीआयडीकडून नोंदवण्यात आला असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.