परळीमध्ये पाटलांचे फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना, माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती, अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली होती.

    मुंबई: बीड जिल्ह्यात पावसाने थैमान घालत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले, अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. अशातच दुसरीकडे बीड दौऱ्यावर असलेल्या जयंत पाटील याचे काल परळीत फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आले. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पाटलांच्या जंगी स्वागतानंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ”पाटील आधी चंद्रावर होते. मात्र टीका झाल्यानंतर ते पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर गेले” , अशी खोचक टीका पडळकरांनी केली

    जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील केज येथे अतिवृष्टी झालेल्या विविध गावांना भेटी दिल्या व पूरपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर संध्याकाळी परळीमध्ये पाटलांचे फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना, माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती, अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली होती.

    मांजरा प्रकल्पाचे जवळपास पूर्ण दरवाजे उघडल्याने नदीला पूर आला आहे व त्यामुळे पुढील अनेक गावे प्रभावित झाली आहेत, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.