धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर लोकांनीची दणक्यात सोने खरेदी, देशभरात तब्बल 75,000 कोटी रुपयांची विक्री

सध्या सोने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा ८ हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला आहे. कोविड-१९ चे रुग्ण कमी झाल्यामुळे ग्राहकांचे सेंटिमेंट पॉझिटिव्ह झाले आहेत. यावर्षी जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये देशात सोन्याच्या मागणीमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

    यंदा दिवाळीपूर्वीच सोन्याला नवी झळाळी मिळाल्याचे दिसत आहे. सोन्याचे दागिने आणि नाण्यांची विक्री कोविडपूर्व पातळीपर्यंत पोहोचली. दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आल्याने ग्राहकांची गर्दी सोने खरेदीसाठी दुकानांकडे वळली. धनत्रयोदशीला देशभरात सुमारे 75000 कोटी रुपयांची विक्री झाली. सुमारे 15 टन सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली. सोन्याची नाणी आणि इतर लहानसहान वस्तूंच्या विक्रीत वाढ झाली आहे. यामध्ये ऑनलाईन खरेदीचाही लक्षणीय वाटा आहे. हिंदू मान्यतेनुसार धनत्रयोदशी हा मौल्यवान धातू ते भांडी खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो.

    कन्फेडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या माहितीनुसार धनतेरसच्या दिवशी देशभरात ७ हजार ५०० कोटींची सोने आणि चांदी खरेदीची उलाढाल झाली. २००१९ च्या महामारीच्या आधीच्या वर्षापेक्षाही यंदा ही खरेदी वाढलेली पहायला मिळाली आहे. जवळपास १५ टन इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची विक्री धनतेरसच्या निमित्ताने झाली. याधी २०२० धनतेरसच्या निमित्ताने झालेली सोन्याची उलाढाल ही ३ हजार कोटी ते ५ हजार कोटी होती. तर २०१९ मध्ये सोन्याच्या खरेदीचा आकडा ४ हजार ५०० कोटी इतका होता.

    सध्या सोने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा ८ हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला आहे. कोविड-१९ चे रुग्ण कमी झाल्यामुळे ग्राहकांचे सेंटिमेंट पॉझिटिव्ह झाले आहेत. यावर्षी जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये देशात सोन्याच्या मागणीमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर सातत्याने व्यवसाय वाढत आहे.