
अघोरीपणाच्या परिसीमा गाठणारी घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील एका कुटुंबाने विवाहितेला मूल होत नसल्याने तिला नरक यातना दिल्या आहेत. तिला जबरदस्तीने कोंबडीचे रक्त पाजले. त्यानंतर झाडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : अघोरीपणाच्या परिसीमा गाठणारी घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील एका कुटुंबाने विवाहितेला मूल होत नसल्याने तिला नरक यातना दिल्या आहेत. तिला जबरदस्तीने कोंबडीचे रक्त पाजले. त्यानंतर झाडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अमितने इंजिनिअर असल्याची खोटी माहिती देऊन पीडितेशी लग्न केले होते. मूल जन्माला घालण्यासाठी नवरा लैंगिकदृष्ट्या सक्षम नव्हता, त्यामुळे पीडितेला मागील तीन वर्षात मूलबाळ झाले नाही. ही बाब पीडितेने आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर सासरच्यांनी पीडितेचा छळ करायला सुरुवात केली होती.
तसेच मूल होण्यासाठी एका भोंदूबाबाच्या सांगण्यावरून पीडितेला कोंबडीचे रक्त पाजून अघोरी प्रकार देखील केला आहे. तसेव सासऱ्याने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा करण्याचा प्रयत्न केला.