Realme X9 आणि Realme X9 Pro जुलैमध्ये लाँच होणार ; पाहा काय आहेत स्मार्टफोन्सचे फीचर्स

Realme X9 Pro मध्ये 6.55-इंचाचा S-AMOLED E3 कर्व एज डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रिजोल्यूशन FHD+ असेल. हा फोन स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटसह सादर केला जाईल. या फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते.

    Realme लवकरच Realme X9 आणि Realme X9 Pro स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे फोन चीनमध्ये लाँच केले जातील. आता एका चिनी टिपस्टरने दावा केला आहे कि रियलमीची आगामी Realme X9 सीरीज जुलैमध्ये लाँच करण्यात येईल.

    Realme X9 स्मार्टफोनची किंमत 2,000 युआन (अंदाजे 21,500 रुपये) पासून सुरु होऊ शकते. तर Realme X9 Pro स्मार्टफोन 2,500 युआन (अंदाजे 26,600 रुपये) मध्ये लाँच केला जाईल, अशी माहिती 91mobiles ने दिली आहे.

    यातील Realme X9 मध्ये Snapdragon 778G चिपसेट देण्यात येईल तर X9 Pro स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 प्रोसेसर मिळेल, अशी माहिती टिप्सटरने यापूर्वीच दिली आहे.