सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने घेतली लग्नाच्या सुरक्षेची जबाबदारी; जेवणात कर्नाटक आणि थायलंडमधील भाज्या

कतरिना आणि विक्कीच्या लग्नासाठी आलेल्या भाज्या देशाच्या अनेक राज्यातून आणि परदेशातून मागवण्यात आल्या आहेत. थायलंडमधूनही अनेक प्रकारच्या भाज्या मागवल्या आहेत. त्याचबरोबर कर्नाटकातून लाल केळी आणि मशरूमची आयात करण्यात आली आहे. याशिवाय पालक, कोबीसह इतर अनेक भाज्यांचीही खरेदी कर्नाटकातूनच करण्यात आली आहे. इतकंच नाही तर त्यांच्या पाहुण्यांसाठी हॉटेलमध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे. लग्नातील व्हीआयपी पाहुण्यांसाठी मुंबईहून ४ डझन क्रॉकरी मागवण्यात आल्या आहेत.

    सध्या बॉलिवूड कतरिना कैफ विकी कौशलसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. दोघेही ९ डिसेंबरला राजस्थानमधील बरवारा येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तिचा मित्र सलमान खान देखील कतरिना कैफला तिच्या लग्नाच्या तयारीत मदत करत आहे. लग्नाच्या ठिकाणाची सुरक्षा सलमानचा बॉडीगार्ड शेराला देण्यात आली आहे. शेरा एक सुरक्षा कंपनी चालवतो. टायगर सिक्युरिटी असे त्याच्या कंपनीचे नाव आहे. सोबतच या जोडप्याच्या लग्नासाठी देश-विदेशातील अनेक राज्यांतून भाजीही मागवण्यात आली आहे.

    कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या व्हेन्यू सिक्स सेन्स फोर्टच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी आता शेराच्या कंपनीच्या हातात आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आणि व्हीआयपी पाहुणे या ठिकाणी उपस्थित रहाणार असल्याने शेराच्या कंपनीसोबतच वाय बर्वरा पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.