सॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये लाँच; आता ‘ही’ गोष्ट नसल्यासही तुम्हाला निवडक मोफत चॅनल्स पाहण्याचा आनंद घेता येणार

टीव्‍ही प्‍लस ओ ओएस किंवा उच्‍च सॉफ्टवेअर व्‍हर्जन्‍स असलेल्‍या बहुतांश सॅमसंग गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स आणि टॅब्‍लेट डिवाईसेसवर देखील उपलब्‍ध असेल. गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍ससाठी सर्विसेस एप्रिल २०२१ मध्‍ये सुरू होण्‍याची अपेक्षा आहे. सॅमसंग गॅलेक्‍सी स्‍टोअर व गुगल प्‍ले स्‍टोअरमधून टीव्‍ही प्‍लस ॲप डाऊनलोड करता येऊ शकते.

  • टीव्‍ही प्‍लस २०१७ पासूनच्‍या सॅमसंग स्‍मार्ट टीव्‍ही मॉडेल्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल
  • ओ ओएस किंवा उच्‍च सॉफ्टवेअर व्‍हर्जन असलेले गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स व टॅब्‍सचा वापर करणारे ग्राहक देखील या सेवांसाठी पात्र असतील

नवी दिल्ली : सॅमसंगने आज सॅमसंग टीव्‍ही प्‍लस सेवेच्‍या लाँचची घोषणा केली. ही सेवा सॅमसंग स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍सच्‍या ग्राहकांना मोफत टीव्‍ही कन्‍टेन्‍टसह जाहिरातीसह निवडक लाइव्‍ह चॅनेल्‍स व ऑन-डिमांड व्हिडिओज पाहण्‍याचा आनंद देते. यासाठी सेट टॉप बॉक्‍स सारख्‍या अतिरिक्‍त डिव्हाइसची गरज नाही. या सेवेचा लाभ घेण्‍यासाठी ग्राहकांकडे फक्‍त सॅमसंग स्‍मार्ट टीव्‍ही (२०१७ पासूनचे मॉडेल) आणि इंटरनेट कनेक्‍शन असण्‍याची गरज आहे.

टीव्‍ही प्‍लसच्‍या सादरीकरणासह ग्राहकांना त्‍वरित बातम्‍या, जीवनशैली, तंत्रज्ञान, गेमिंग व विज्ञान, क्रीडा व आऊटडोअर्स, संगीत, चित्रपट व मालिका अशा प्रकारच्‍या शैलींमधील आकर्षक कन्‍टेन्‍ट कोणत्‍याही सबस्क्रिप्‍शनशिवाय पाहता येईल.

टीव्‍ही प्‍लस ओ ओएस किंवा उच्‍च सॉफ्टवेअर व्‍हर्जन्‍स असलेल्‍या बहुतांश सॅमसंग गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स आणि टॅब्‍लेट डिवाईसेसवर देखील उपलब्‍ध असेल. गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍ससाठी सर्विसेस एप्रिल २०२१ मध्‍ये सुरू होण्‍याची अपेक्षा आहे. सॅमसंग गॅलेक्‍सी स्‍टोअर व गुगल प्‍ले स्‍टोअरमधून टीव्‍ही प्‍लस ॲप डाऊनलोड करता येऊ शकते.

महामारीमुळे करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनदरम्‍यान ग्राहकांच्‍या कन्‍टेन्‍ट पाहण्‍याच्‍या वर्तणुकीमध्‍ये झालेला बदल लक्षात घेत नाविन्‍यपूर्ण सेवा सादर करण्‍यात आली आहे. लॉकडाऊन दरम्‍यान ग्राहकांनी, विशेषत: मिलेनियल्‍स व जनरेशन झेडने नवीन व रोमांचक कन्‍टेन्‍टसाठी अधिक प्रमाणात टेलिव्हिजन्‍स पाहण्‍यास सुरूवात केली. भारतामध्‍ये सॅमसंग टीव्‍ही प्‍लस सेवा त्‍वरित २०१७ ते २०२१ पर्यंतच्‍या सर्व स्‍मार्ट टीव्‍ही मॉडेल्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल आणि युजर्सना २७ जागतिक व स्‍थानिक चॅनेल्‍स पाहता येतील. ही सेवा अधिक उपलब्ध करण्‍यासाठी लवकरच अधिक भागीदारांसोबत सहयोग करण्‍यात येणार आहे.

”मागील एक वर्षापासून ग्राहक घरामध्‍येच वेळ व्‍यतित करत आहेत. त्‍यांचे टेलिव्हिजन सेट्स व स्‍मार्टफोन्‍स मनोरंजन, तसेच माहितीसाठी त्‍यांच्‍या जीवनाचे महत्त्वपूर्ण भाग बनले आहेत. आमच्‍या निदर्शनास आले की ग्राहक आता उत्तम मीडिया कन्‍टेन्‍टला अधिक महत्त्व देतात, याच कारणामुळे आम्‍ही भारतामध्‍ये सॅमसंग टीव्‍ही प्‍लस सेवा सादर करण्‍याचे ठरवले. पुढील काही महिन्‍यांमध्‍ये आम्‍हाला अधिक चॅनेल्‍स व कन्‍टेन्‍टची भर करण्‍यासाठी टीव्‍ही प्‍लस सेवेमध्‍ये वाढ होण्‍याची अपेक्षा आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या सर्विसेसच्‍या संचालक रेश्मा प्रसाद वीरमणी म्‍हणाल्‍या.

सॅमसंग मागील दशकापासून भारतातील टेलिव्हिजन्‍सचा पहिल्‍या क्रमांकाचा ब्रॅण्‍ड राहिला आहे आणि हा ब्रॅण्‍ड १८,९०० रूपये ते १५,७९,९०० रूपयांपर्यंतच्‍या रेंजमध्‍ये स्‍मार्ट टीव्‍हींची श्रेणी देतो.

भारतातील या लाँचसह सॅमसंग टीव्‍ही प्‍लस आता युएस, कॅनडा, कोरिया, स्वित्‍झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, युके, इटली, फ्रान्‍स, स्‍पेन, ऑस्‍ट्रेलिया, ब्राझील व मेक्सिकोसह १४ देशांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

जागतिक स्‍तरावर सॅमसंग टीव्‍ही प्‍लस सॅमसंग स्‍मार्ट टीव्‍ही व गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन युजरला बातम्‍या, क्रीडा, मनोरंजन अशा क्षेत्रांमधील ८०० हून अधिक चॅनेल्‍स पाहण्‍याची सुविधा देते. सॅमसंग टीव्‍ही प्‍लस आणि चॅनेल लाइन-अपबाबत माहितीसाठी कृपया https://www.samsung.com/in/tvs/smart-tv/samsung-tv-plus/ येथे भेट द्या.